...म्हणून मिर्झापूर 2 मधून तो सीन काढला; त्या लेखकांची मागितली माफी

...म्हणून मिर्झापूर 2 मधून तो सीन काढला; त्या लेखकांची मागितली माफी

सुरेंद्र मोहन पाठक या लेखकाने मिर्झापूर 2 मधील आक्षेपार्ह सीन काढून टाकण्याची मागणी केली होती. तो सीन काढून टाकला नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता.

  • Share this:

मुंबई, 31ऑक्टोबर: मिर्झापूर 2 (Mirzapur 2) या वेब सीरिजची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ही वेब सीरिज लोकांना आवडत असली तरी प्रदर्शित होण्याआधीपासूनच ही वेब सीरिज वेगवेगळ्या वादांमध्ये अडकत आहे. लेखक सुरेंद्र मोहन पाठक (Surendra Mohan Pathak) यांनी वेब सीरिजच्या एका सीनवर आक्षेप घेतला होता. पाठक यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर तो सीन वेब सीरिजमधून काढून टाकण्यात आला आहे.

वेब सीरिजच्या एका सीनमध्ये सत्यानंद त्रिपाठी ( कुलभूषण खरबंदा) यांच्या हातात सुरेंद्र मोहन पाठक यांचं 'धब्बा' हे पुस्तक असतं. हातात पुस्तक घेऊन जे नरेशन करण्यात आलं आहे. त्यानंतरच पुढचा सगळा गोंधळ सुरू होतो. त्या सीनवर लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी आक्षेप घेतला होता. हा सीन काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली होती. एक्सेल एन्टरटेनमेंटने हा सीन मिर्झापूर 2 मधून काढून टाकला आहे. आणि लेखकाची माफीही मागितली आहे.

एक्सेल एंटरटेनमेंटच्या ट्विटर हँडलवर एक पत्र शेअर करण्यात आलं आहे. या पत्रात लिहीलं आहे, "मिर्झापूर 2 मध्ये धब्बा हे पुस्तक आमच्या एका कलाकाराच्या हातात दाखवण्यात आलं आहे. तेव्हा सुरू असलेल्या नरेशनवर लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी आक्षेप घेतला आहे. या सीनमुळे तुमच्या आणि तुमच्या चाहत्यांच्या भावना दुखवल्या असतील तर आम्ही माफी मागतो. या सीनमधून तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा आमचा हेतू नव्हता."

सुरेंद्र मोहन पाठक या लेखकाने मिर्झापूर 2 मधील अक्षेपार्ह सीन काढून टाकण्याची मागणी केली होती. तो सीन काढून टाकला नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 31, 2020, 3:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading