Home /News /entertainment /

'या' पात्रांमुळे Mirzapur 2मध्ये येणार नवा ट्विस्ट; वाचा फक्त एका क्लिकवर

'या' पात्रांमुळे Mirzapur 2मध्ये येणार नवा ट्विस्ट; वाचा फक्त एका क्लिकवर

मिर्झापूर 2 (Mirzapur 2) पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली आहे. मिर्झापूरच्या आधीच्या सिझनप्रमाणेच या भागातही जबरदस्त मसाला, अ‍ॅक्शन सीनचा भडीमार असणार आहे. या भागामध्ये काही नवीन चेहरेही पाहायला मिळतील.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : मिर्झापूर (Mirzapur) या वेबसीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. पहिला सिझन पूर्ण पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझिनचे वेध लागले होते. येत्या 23 ऑक्टोबरला मिर्झापूर 2 (Mirzapur 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूर 2च्या ट्रेलरलाच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. रीलिज झाल्यानंतर अवघ्या मिनिटांतच यूट्यूबवर हा व्हिडीओ टॉप ट्रेंड करत होता. मिर्झापूर 2 केवळ भारतातच नाही तर 200 पेक्षा जास्त देशांमध्ये पाहिला जाणार आहे. मिर्झापूरचा ट्रेलर लाँच झाल्यावर सोशल मीडियावर #BoycottMirzapur2 असाही एक ट्रेंड व्हायरल झाला होता. मिर्झापूरमध्ये गुड्डू भय्याची भूमिका करणाऱ्या अली फजल या अभिनेत्याने हा पेड ट्रेंड असल्याचा आरोप केला आहे. आता मिर्झापूर 2ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे पाहण्यासारखं आहे. मिर्झापूर 2 मध्ये काय असेल खास? मिर्झापूरच्या या सिझनमध्ये गुड्डू (अली फजल)ने कशाप्रकारे त्रिपाठी कुटुंबाचा सूड घेणार आहे हे दाखवलं जाईल. कालीन आणि मुन्नाचा सूड घेण्यासाठी गुड्डूसोबत गोलू (श्वेता त्रिपाठी)देखील उभी राहणार आहे. पहिल्या भागाच्या शेवटी मुन्ना भय्याने (दिव्येंदू शर्मा) कालीनच्या सांगण्यावरुन स्विटी (श्रेया पिळगावकर) आणि बबलू (विक्रांत मेस्सी)ला मारुन टाकलं होतं. गुड्डू भय्याच्या पायाला देखील गोळी लागली होती. ही कथा आहे सूडाची, रागाची. मिर्झापूरच्या या भागातही जबरदस्त मसाला, अ‍ॅक्शन सीन आणि शिव्यांचा भडीमार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. <iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/xMKzdQrC5TI" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe> मिर्झापूर 2मध्ये नव्या पात्रांची एन्ट्री मिर्झापूर 2मध्ये काही नव्या कलाकारांची एन्ट्रीसुद्धा होणार आहे. यामध्ये विजय शर्मा, प्रियांशु पेनयुली, इशा तलवार अशा नव्या कलाकारांनीही काम केलं आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे कथानकांमध्ये अधिक ट्विस्ट येणार आहे. मिर्झापूरचा पहिला भाग 2018मध्ये रीलिज झाला होता. सामान्य घरातून आलेल्या 2 भावांना चुकीचे निर्णय आणि परिस्थितीमुळे कशाप्रकारे गुन्हेगारी विश्वामध्ये ढकललं जातं याची कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. मिर्झापूरच्या  पहिल्या भागामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Triapathi), विक्रांत मेस्सी (Vikrant Massey), अली फजल (Ali Fazal), श्रेया पिळगावकर (Shreya Pilgaonkar), श्वेता त्रिपाठी (rasika Dugal) रसिका दुग्गल यांच्या महत्वाच्या भूमिका होता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Amazon, Web series

    पुढील बातम्या