'मिर्झापूर 2' प्रदर्शनाआधीच वादात, टीका करणाऱ्यांवर मुन्ना त्रिपाठी संतापला

'मिर्झापूर 2' प्रदर्शनाआधीच वादात, टीका करणाऱ्यांवर मुन्ना त्रिपाठी संतापला

बहुप्रतिक्षित मिर्झापूर 2 (Mirzapur2) ही वेबसीरिज प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मिर्झापूर 2ला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर: जबरदस्त कथा, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले संवाद आणि उत्तम पात्र निवड यामुळे मिर्झापूर (Mirzapur) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकताच मिर्झापूरच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला. पण मिर्झापूरचा दुसरा भाग रीलिज होण्याआधीच वादात सापडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या सोशल मीडियावर 'बॉयकॉट मिर्झापूर 2' अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेकांनी त्याला विरोध केला आहे.

मिर्झापूरचा ट्रेलर रीलिज झाल्यावर लगेचच त्यावर मीम्सही बनायला लागली आहेत. काहींनी 'मिर्झापूर 2' बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मिर्झापूरमध्ये काम करणारा अभिनेता दिव्येंदू शर्मा याने मात्र "आम्ही अशा मागण्याकडे लक्ष देत नाही" अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. "हा निव्वळ मूर्खपणा आहे". असंही तो म्हणाला. दिव्येंदू शर्मा (Divyendu Sharma)ने मिर्झापूर 2 मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं नाव 'मुन्ना त्रिपाठी' आहे. "अनेक महिन्यांपासून मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मिर्झापूरवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे मुठभर विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही. पैसे देऊन काही लोकं मुद्दाम असे ट्रेंड काढत आहेत. अशा ट्रेंडला काहीच अर्थ नाही." असं मत दिव्येंदू शर्माने व्यक्त केलं आहे.

अभिनेता अली फजलने या वेब सीरिजमध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या (सीएए) CAA आंदोलनामध्ये अली फजलनेही सहभाग घेतला होता. त्यामुळे देशप्रेमी व्यक्तींनी मिर्झापूर 2 पाहू नये असं आवाहन केलं जात आहे. अली फजल (Ali Fazal)ने रिया चक्रवर्तीलादेखील अनेकदा मदत केली आहे. त्यामुळे त्याने काम केलेल्या वेबसीरिजला विरोध केला जात आहे. एकूणच काय, तर प्रदर्शनाआधीच मिर्झापूर 2 ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 13, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या