Home /News /entertainment /

Mira Jagannath: वजन कमी करण्यासाठी मीरा जगन्नाथची भन्नाट कल्पना, VIDEO पाहून तुम्हाला येईल हसू

Mira Jagannath: वजन कमी करण्यासाठी मीरा जगन्नाथची भन्नाट कल्पना, VIDEO पाहून तुम्हाला येईल हसू

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं हे फिटनेस रुटीन भल्याभल्यांना घाम गाळायला लावेल पण एका नव्या ट्विस्टसोबत

  मुंबई 20 जून: बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) ही कार्यक्रमापासूनच चर्चेत राहिली आहे. बिग बॉसच्या कार्यक्रमात झालेल्या अनेक गोष्टींमुळे मीरा जाम लोकप्रिय झाली होती. सध्या मीराच्या एका नव्या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे. मीरा कायमच आपल्या फिटनेसबद्दल सजग राहिली आहे. बिग बॉसच्या कार्यक्रमात सुद्धा मीरा (Mira Jagannath Fitness) फिटनेसबाबत एकदम चोख होती हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मीरा सोशल मीडियावर सुद्धा (Mira Jagannath Instagram) बरीच ऍक्टिव्ह असते. तिच्या फिटनेसच्या अनेक गोष्टी, अनेक अपडेट्स शेअर करताना दिसते. पण मीराचा हा नवा विडिओ बघून मात्र सगळेच चक्रावले आहेत. मीराने वजन कमी करायचा एक रामबाण आणि भन्नाट उपाय शोधून काढला आहे. मीरा या व्हिडिओमध्ये waffle खात ट्रेडमिलवर चालताना दिसत आहे. यामध्ये ती असं म्हणते, “माझा नवा शोध असा की ‘खात खात चाला.’ मी एक अशक्य foodie असल्याने मी विचार केला की खाता-खाताच ट्रेडमिलवर चालावं म्हणजे मी जेव्हा खाली उतरेन तेव्हा आपोआप माझ्या कॅलरी बर्न झाल्या असतील.” तिची ही भन्नाट कल्पना बघून अनेकांनी डोक्याला हात मारला आहे.
  अनेकांनी तिच्या या जगावेगळ्या अतरंगी कल्पनेचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिच्या काळजीने असं करू नको म्हणत तिला सल्ला दिला आहे. मीरा असे अनेक भन्नाट प्रकार याआधी सुद्धा करत आली आहे. हे ही वाचा-Maha Minister: देव तारी त्याला कोण मारी! एका गायीने कसे वाचवले आदेश भाऊजींचे प्राण? कलाकार हे कायमच फिट आणि फाईन कसे दिसतात असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर त्यामागे योग्य डाएट पाळणं, वेळच्या वेळी व्यायाम करणं, व्यवस्थित जेवण करणं अशा अनेक गोष्टी आणि अनेक रुटीन ते फॉलो करताना दिसतात. पण मीराच्या या रुटीनमुळे आता ती फॅट कमी करत करत खात आहे हे पाहून अनेकांना हसू आवरण कठीण जात आहे. मीरा असे काहीतरी भन्नाट प्रकार कायमच करत आली आहे. बिग बॉस नंतर मोठ्या प्रोजेक्टमध्ये ती दिसली नसली तिचा चाहतावर्ग टिकून आहे. तिला लवकरात लवकर नव्या प्रोजेक्ट मध्ये पाहायला चाहते उत्सुक आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या