अगदी लठ्ठ दिसणाऱ्या स्मृती इराणी आता सडपातळ झाल्या आहेत. अगदी फॅट टू फिट झाल्या आहेत. स्मृती इराणींना या फोटोत पाहून तुम्हाला तुलसी वीरानीची आठवण नक्कीच झाली असेल. स्मृती इराणी अगदी आधीसारख्याच दिसत आहेत. त्यांनी आपलं वजन बऱ्यापैकी कमी केलं आहे. अगदी जसं काही हा फोटो स्मृती इराणींचा जुन्या फोटोंपैकीच एक असावा असं वाटतो आहे. पण स्मृती यांचा हा फोटो लेटेस्ट आहे. त्यांनी सध्या आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतं आहे. हे वाचा - बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लॉकडाउनमध्ये केलं लग्न स्मृती इराणीसुद्धा आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. क्योंकी सास भी कभी बहूमधील आपले फोटो शेअर करत असतात, त्यावर मिम्सही बनवत असतात. याआधी स्मृती यांनी मनोरंजन क्षेत्रात काम करताना आणि आताचा असे आपले दोन फोटो शेअर करत त्यामध्ये तुलनाही केली होती. आपल्या वाढत्या वजनाबाबत त्यांनी पोस्ट केली होती. हे वाचा - दिलीप कुमारांनी केलं होतं दुसरं लग्न; मग का परतले पहिली पत्नी सायरा बानोकडे? आता तर त्यांनी आपल्या वजनाची चिंता फक्त फोटोपुरती मर्यादित न ठेवता, त्याला गांभीर्याने घेतल्याचं दिसतं आहे आणि वजन कमी करण्यासाठी त्या अतोनात प्रयत्न करत आहेत, त्याचाच हा परिणाम आता तुमच्यासमोर दिसतोच आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Entertainment, Smriti irani, Tv actress