अभिनेत्री कृति सेनन होणार सरोगसी मदर, ‘मिमी’चा फर्स्ट लुक रिलीज

अभिनेत्री कृति सेनन होणार सरोगसी मदर, ‘मिमी’चा फर्स्ट लुक रिलीज

'मिमी' हा सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमावर आधारित आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन मागच्या काही काळापासून तिचा आगामी सिनेमा ‘मिमी’मुळे चर्चेत आहे. आता या सिनेमाचं फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. हा सिनेमा सरोगसीवर आधारित आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लुक पोस्टरवर या दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यातल्या एका हातात बाळ असून दुसरा हात हे बाळ घेण्यासाठी पुढे केलेला दिसत आहे.

मिमी हा सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमावर आधारित आहे. ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमात एक विदेशी आणि गरीब भारतीय महिलेची कथा आहे. जी एका बाळाशी जोडलेली आहे. या मराठी सिनेमाला 2011 सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘सरोगसी मदर’ या संवेदनशील विषयावर बेतलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. मिमी या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

या सिनेमामध्ये अभिनेत्री कृति सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या सिनेमाच्या रिलीज डेट बाबत कोणतीही कृतिनं या सिनेमाच्या फर्स्ट लुकचं पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, आयुष्यातला असा प्रवास जो अशक्य अशा चमत्कारांनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. ‘मिमी’ हे खूप खास असणार आहे.

या सिनेमाची निर्मिती दिनेश विजान यांची असून या सिनेमात कृति सेनन सोबत पंकज त्रिपाठी सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कार्तिक आर्यनसोबतचा कृति सोननचा लुकाछुपी हा सिनेमा खूप गाजला होता. त्यानंतर ती कृति सेनन अर्जुन पटियाला या सिनेमात दिसली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.

===============================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 06:58 PM IST

ताज्या बातम्या