Home /News /entertainment /

बॉलिवूड अडकलं COVID च्या विळख्यात; मिलिंद सोमणला झाली कोरोनाची लागण

बॉलिवूड अडकलं COVID च्या विळख्यात; मिलिंद सोमणला झाली कोरोनाची लागण

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    मुंबई 26 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिलिंद आणि त्याच्या कुटुंबीयांना सध्या घरातच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. (Milind Soman has tested positive) माझी तब्येत स्थिर कोणीही काळजी करु नये अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे. शिवाय कोरोनापासून सावध राहा, घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या. असा सल्ला त्यानं चाहत्यांना दिला आहे. अवश्य पाहा - संगीतकार होण्यासाठी ‘या’ गायकानं सरकारी नोकरीवर मारली लाथ २४ तासांत ५ हजार १८५ नव्या रुग्णांची भर पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात ५ हजार १८५ नवे करोनाबाधित सापडले असून मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ७४ हजार ६११ इतकी झाली आहे. त्यापैकी ३० हजार ७६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत. करोनाचं संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने ३ हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ ५ हजारांच्या वर गेली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood News, Covid-19, Covid-19 positive, Health, Milind soman, Wellness

    पुढील बातम्या