मुंबई 28 मे: अभिनेते आणि प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हे त्यांच्या फिटनेससाठी अतिशय लोकप्रिय आहेत. स्वतःला फिट ठेवण्यासोबतच ते इतरांनाही फिट राहण्याची प्रेरणा नेहमीच देत असतात. व आपल्या चाहत्यांनीही फिट रहावं यासाठी ते प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार यावेळी मिलिंद यांनी केला आहे त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिलिंद यांच्या एका चाहत्या महिलेकडून त्यांनी भर रस्त्यात पुशअप्स करवून घेतले आहेत. (Milind soman video) मिलिंदने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत पाहू शकतो की एका मार्केट मध्ये मिलिंद खरेदी साठी गेले असता एक महिला त्यांच्याकडे सेल्फी घेण्यासाठी येते. पण फिटनेस फ्रिक मिलिंदने त्या महिलेला पुशअप्स काढायला सांगितले व त्या चाहत्या महिलेने देखिल ते काढले.
View this post on Instagram
मिलिंदने या व्हिडीओला कॅप्शन देत याची माहिती दिली आहे. त्यात लिहीलं आहे, ‘मी एका मार्केट मध्ये होतो बहुतेक रायपूर मध्ये. तेव्हा एक महिला माझ्याकडे सेल्फी घेण्यासाठी आली. तेव्हा मी तिला 10 पुशअप्स म्हणालो, त्याबरोबर तिने कोणताही संकोच न करता भर रस्त्यात तेही साडीवर पुशअप्स करायला सुरुवात केली. मी कॅमेरा सुरू करण्याआधी तिने सुरू केलं होत. कधी कधी फिटनेस हा तुम्हाला चांगल जगायला मदत करतो.’
View this post on Instagram
मिलिंदचा हा सध्या सोशल मीडियाववर व्हायरल होत आहे. अनेकांनी या वर कमेंट्स केल्या आहेत. काहींना मिलिंदचा हा अंदाज पसंतीस पडला तर काहींना हे आवडलं देखिल नाही. व अशाप्रकारे एका महिलेला भर रस्त्यात पुशअप्स करायला लावणं अनेकांच्या पचनी पडलं नाही. तर मिलिंदच्या काही चाहत्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Milind soman