55व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह; VIDEO शेअर करत मिलिंद सोमणने सांगितला फिटनेस फंडा

55व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह; VIDEO शेअर करत मिलिंद सोमणने सांगितला फिटनेस फंडा

मिलिंद सोमणने (Milind Soman) त्याचा फिटनेस फंडा सगळ्यांसोबत शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: वयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंद सोमणचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. त्याच्या मॉडेलिंग आणि अभिनयापेक्षा तो फिटनेसमुळेच जास्त चर्चेत असतो.  मिलिंद सोमण (Milind Soman) नुकताच ईशान्येकडील राज्यात फिरायला गेला होता. तिथल्या फालूत नावाच्या एका डोंगरावर त्याने शीर्षासन केलं. तिथला योगाभ्यास करतानाचा मिलिंद सोमणचा फोटो व्हायरल झाला होता. आता मिलिंद सोमणचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिलिंद सोमणच्या व्हिडीओमध्ये काय आहे?

मिलिंद सोमणच्या नव्या व्हिडीओमध्ये तो पुशअप्स (PushUps) करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्याने केलेले पुशअप्स नेहमीच्या पुशअप्सपेक्षा थोडे वेगळे आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आला आहे. “दररोज काहीतरी वेगळं ट्राय करा "Try something new everyday !! #feelitreelit #reels #pushupseveryday #fitindia" असं कॅप्शन मिलिंद सोमणने दिलं आहे. रोज व्यायाम करा आणि काहीतरी वेगळं ट्राय करत राहा हाच त्याचा फिटनेस फंडा आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचं तर मिलिंद सोमण लवकरच पौरषपूर या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. Alt Balaji वर त्याची ही वेब सिरीज पाहायला मिळणार आहे. पौरषपूर सीरिजचा टीझर आल्यानंतर सर्वात जास्त चर्चा मिलिंद सोमणच्या लूकचीच झाली होती. या सीरिजची कथा अतिशय वेगळी आहे. आजपर्यंत मिलिंदने अनेक मॉडेलिंग असाईन्समेंट्स केल्या आहेत तसंच चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पण पौरषपूरमध्ये काम करण्याचा अनुभव अतिशय वेगळा असल्याचं तो सांगतो.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 14, 2020, 12:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या