वेब सीरिजमधील इंटिमेट सीनवर काय होती बायकोची रिअ‍ॅक्शन, मिलिंदनं केला खुलासा

वेब सीरिजमधील इंटिमेट सीनवर काय होती बायकोची रिअ‍ॅक्शन, मिलिंदनं केला खुलासा

वेब सीरिज 'फोर मोअर शॉट्स प्लीज'मध्ये मिलिंद सोमणनं सयानी गुप्तासोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत. ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त अभिनय आणि फिटनेसमुळे स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता मिलिंद सोमण सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याची वेब सीरिज 'फोर मोअर शॉट्स प्लीज'बद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आणि यासोबतच त्यानं त्याच्या खासगी जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. या वेब सीरिज मधील अभिनेत्री सयानी गुप्तासोबतचे त्याचे इंटिमेट सीन्स पाहिल्यावर मिलिंदची पत्नी अंकिताची प्रतिक्रिया काय होती याचाही खुलासा त्यानं यावेळी केला.

मिलिंद सोमण सहसा त्या पर्सनल लाइफबद्दल बोलणं टाळतो. मात्र नुकत्याच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याच्या पर्सनल लाइफबद्दल सुद्धा अनेक खुलासे केले. फोर मोअर शॉट्स प्लिज या वेब सीरिजमध्ये दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल बोलताना मिलिंद म्हणला, मी अभिनेता असल्यानं असे सीन माझ्यासाठी अजिबात मोठी गोष्ट नव्हती. मात्र मी असे सीन करणार हे कळल्यावर अंकिताची प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी होती.

मिलिंद म्हणाला, या वेबसीरिज मधील माझे इंटिमेट सीन पाहिल्यानंतर सुद्धा अंकिता खूप कूल होती. जेव्हा मला पहिला सीझन मिळाला त्यावेळी मी स्क्रिप्ट तिच्यासोबतच वाचली होती आणि त्यात इंटिमेट सीन्सचा उल्लेख होता. ज्यात टेबलवर अंडरविअरवर चालण्याचा सुद्धा सीन होता. या सीन बद्दल ऐकल्यावर तिला फारसा फरक पडला नाही ती खूश होती आणि ती म्हणली की हे खरंच धमाकेदार असणार आहे. ती या वेब सीरिजसाठी खूप उत्साहित होती.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी 2018 मध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या मुलाखतीत मिलिंदनं लग्नानंतर त्याच्या लाइफमध्ये अनेक बदल झाल्याचं मान्य केलं. तो म्हणाला, पूर्वी मी एखादी गोष्ट करताना कोणाला विचारत नसे मात्र आता प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर मी अंकितासोबत चर्चा करतो. हा माझ्या लाइफमधला खूप मोठा बदल आहे.

First published: April 26, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या