मिलिंद सोमणची बायको त्याला 'बाबा' म्हणून हाक मारते? VIDEO VIRAL

मिलिंद सोमणची बायको त्याला 'बाबा' म्हणून हाक मारते? VIDEO VIRAL

अंकिता आणि मिलिंद यांच्या वयात जवळपास 26 वर्षांचं अंतर आहे. यामुळे लग्नानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता मिलिंद मागच्या बऱ्याच काळापासून त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. 2018मध्ये मिलिंद मॉडेल अंकिता कोनवारसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. त्यानंतर त्यांच्या या लग्नाची सगळीकडेच चर्चा रंगली ती या दोघांच्या वयातील अंतरामुळे. अंकिता आणि मिलिंद यांच्या वयात जवळपास 26 वर्षांचं अंतर आहे. यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. त्यानंतर आता मिलिंद सोमणनंच त्याची बायको अंकिता त्याला बाबा म्हणून हाक मारत असल्याचा खुलासा केला आहे.

मिलिंदनं एका व्हिडीओमधून याचा खुलासा केला आहे. हा एक प्रमोशनल व्हिडीओ आहे. ज्यात अंकिता आणि मिलिंद युजर्सच्या कमेंट वाचून त्यावर उत्तर देताना दिसत आहेत. यातच एक कमेंट अशी असते, अंकितानं मिलिंदला बाबा म्हणायला हवं. यावर हलकसं हसत मिलिंद सांगतो , हो ती कधी कधी मला बाबा म्हणून हाक मारते. अंकिता आणि त्याच्या वयातील अंतराविषयी मिलिंद सांगतो, आमच्या दोघांच्याही वयात जवळपास 26 वर्षांचा फरक आहे. हा फरक एवढाच आहे जेवढा मी आणि माझ्या आईच्या वयात आहे.

 

View this post on Instagram

 

'Bali'wood in the sky !! Among the many beauties of Bali are the magnificent stone gates at all the temples, fantastically carved and awe inspiring 😊 this is the gate of the highest of the ancient Besakih temples on the slopes of Mt Agung, and the energy inside was really powerful!! #Bali #trekking #trek #TravelTales #traveltuesday #bettereveryday #family #temple #betterhabits4betterlife #Live2Inspire #begrateful #bepositive 📷 @angadmen0n

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

मिलिंद सोमणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात तो पत्नी अंकितासोबत दिसत आहे. हा व्हिडीओ #FreeToLove कॅम्पेनचा भाग आहे. यात मिलिंद आणि अंकिता करिअर आणि त्यांच्या पर्सनल लाइफशी संबंधीत काही प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहेत.

वयातील फरकाविषयी मिलिंद सांगतो, हे खूप जास्त अंतर आहे आणि एवढंच अंतर मी आणि माझ्या आईच्या वयात आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. तर अंकिता सांगते, कोणत्याही नात्यात वयामुळे काहीही फरक पडत नाही. वय हे फक्त आकडे आहेत. आणि जर एखाद्या नात्यामुळे समाज खूश आहे मात्र तुम्ही खूश नसाल तर त्या नात्याला अर्थच काय उरतो.

मिलिंद सोमण फिटनेसची खूप काळजी घेतो. तो भारताचा आयर्नमॅन म्हणून ओळखला जातो. याशिवाय वयाच्या 53व्या वर्षीही मिलिंद मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतो. यातील खास गोष्ट अशी की, तो अनवाणी धावतो. मिलिंद फक्त एकटाच या स्पर्धांमध्ये भाग घेत नाही तर इतरांनाही असं करण्यास प्रोत्साहन देतो.

===================================================

VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 02:30 PM IST

ताज्या बातम्या