Home /News /entertainment /

'नियमीत सीटी स्कॅन करा' मिलींद सोमण यांच्या सल्ल्यावर भडकले नेटकरी

'नियमीत सीटी स्कॅन करा' मिलींद सोमण यांच्या सल्ल्यावर भडकले नेटकरी

अभिनेते मिलिंद सोमण (Milind Sonam) यांनी त्यांच्या संपूर्ण बॉडी चेकअप केलं. तर त्याविषयी पोस्ट देखील शेअर केली. पण त्यानंतर मात्र त्यांना चांगलच ट्रोल केलं जातं आहे.

  मुंबई  6 सप्टेंबर : अभिनेते मिलिंद सोमण (Milind Sonam) हे त्यांच्या फिटनेस साठी फारच प्रसिद्ध आहेत. दररोज अनेक किलोमिटर ते धावतात. त्यामुळे अजूनही त्यांचा फिटनेस हा तरुणांना लाजवणारा आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या संपूर्ण बॉडी चेकअप केलं. तर त्याविषयी पोस्ट देखील शेअर केली. पण त्यानंतर मात्र त्यांना चांगलच ट्रोल केलं जातं आहे. अनेकांनी मिलिंद सोमण यांच्या या पोस्ट वर टीका केली आहे. मिलिंद यांनी सोशल मीडिया वर एक फोटो शेअर केला ज्यात ते सीटी स्कॅन करताना दिसत आहेत. तर ते रूटीन चेकअप करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पण नेटिझन्सनी या पोस्टला बेजबाबदार म्हटलं आहे. दरम्यान सिटी स्कॅन करण्यापूर्वी त्यांनी हा फोटो शेअर केला होता. व नियमित रूपाने बॉडी चेक अप करण्याचा सल्ला दिला. तर यात नियमित सीटी स्कॅन करण्याचाही सल्ला दिला. पण फिटनेस साठी प्रसिद्ध असलेल्या मिलिंद यांचं हे ज्ञान ऐकून नेटिझनस भडकलेले दिसले आहेत.
  त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं, ‘बंगळुरूत सीटी स्कॅन केलं. ब्लॉकेजेस इ. ची तपासणी केली. सगळं काही नॉर्मल आहे.  योग्य डॉक्टर्स द्वारे सुचवली जाणारी चाचणी महत्त्वाची असते. पण स्क्रिनिंग शिवाय तुम्ही जे करता ते महत्त्वाचं आहे. जेवण, व्यायाम, झोप, ताणतणाव आणि चांगल्या सवयी हे सगळं सुनिश्चित करण्यास मदत करू शकते की प्रत्येक स्क्रिनिंग शरीराच्या सामान्य स्थितीला दर्शवते. मग तुमचं वय कितीही असो.’ यानंतर अनेकांनी यावर टीका केली, एकाने लिहिलं की, ‘सीटी स्कॅन नियमित तपासणीचा हिस्सा नाही. ही एक स्वतःच्या दुष्प्रभावांची महागडी प्रक्रिया आहे.’ तर दुसऱ्याने लिहिलं ‘विनाकारण सीटी स्कॅन करू नये. ते घातक असते.’  तर आणखी एकाने लिहिलं ‘स्क्रिनिंग साठी सीटी स्कॅन केलं जात नाही. कृपया असे ज्ञान देऊ नका.’
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Milind soman, Model

  पुढील बातम्या