19 डिसेंबर : 90च्या दशकात अनेकांच्या हृदयाची धडकन मिलिंद सोमणची जादू आजही आहे. त्याच्या फिटनेसची तोड नाही. कुठल्याही तरुणाला तो स्पर्धा देऊ शकतो. हाच मिलिंद 2018मध्ये लग्न करतोय ते त्याच्याहून 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कुंवरसोबत.
या दोघांच्या रिलेशनबद्दल बरीच चर्चा आणि टीका झाली होती. अर्थात, दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
गेल्या महिन्यात मिलिंद गुवाहाटीला अंकिताच्या घरी तिच्या भाच्याच्या वाढदिवसाला गेला होता. तिथे तिनं त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली.
अंकिता एक एयरहोस्टेस आहे. मिलिंद आणि तिची ओळख एका रॅम्प वॉकच्या दरम्यान झाली. याआधीही मिलिंद सोमणनं आपल्यापेक्षा लहान 21 वर्षाच्या शहाना गोस्वामीला डेट केलं होतं पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.