मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'देवाने आपल्याला...' न्यूड PHOTOSHOOT वरील टीकेवर मिलिंद सोमणने सोडलं मौन

'देवाने आपल्याला...' न्यूड PHOTOSHOOT वरील टीकेवर मिलिंद सोमणने सोडलं मौन

अभिनेता मॉडेल मिलिंद सोमणच्या (Milind Soman) न्यूड फोटोंवर बरीच टीका होत होती. पहिल्यांदाच त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता मॉडेल मिलिंद सोमणच्या (Milind Soman) न्यूड फोटोंवर बरीच टीका होत होती. पहिल्यांदाच त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता मॉडेल मिलिंद सोमणच्या (Milind Soman) न्यूड फोटोंवर बरीच टीका होत होती. पहिल्यांदाच त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

16 डिसेंबर, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) त्याच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे. आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यानं स्वतःचे गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर नग्नावस्थेत (Nude) धावतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमुळे त्याच्यावर गोवा पोलीसांत अश्लीलतेच्या (Obscenity) आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याचीही चर्चा होती. आतापर्यंत या विषयावर मिलिंदनं कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती, आता मात्र त्यानं मौन सोडलं आहे. आपल्या विरोधातील तक्रारीबाबत कोणतीही अधिकृत नोटीस आली नसल्याचा खुलासा करतानाच त्यानं न्यूड (Nude) फोटोबाबतची आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. पीपिंकमून डॉट कॉमशी बोलताना त्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. 'यात वेगळं काय आहे? देवानं आपल्याला असंच घडवलं आहे. लोक इंटरनेटवर न्यूड फोटो बघत नाहीत का? इन्स्टाग्रामवर अनेकांचे न्यूड फोटो आहेत. मी गेली अनेक वर्षं न्यूड फोटो शूट करून घेत आहे. मी पहिल्यांदा माझे न्यूड फोटो प्रसिद्ध केले होते तेव्हाही मी चर्चेत आलो होतो. प्रत्येक वेळी लोकांची प्रतिक्रिया वेगळी असते. प्रत्येकाचे आपले काहीतरी स्वप्न असते' असे मत त्याने व्यक्त केले आहे.‘माझ्या विरोधात कोणी तक्रार केली हे मला माहीत नाही. मला कोणीही याबाबत माहिती दिलेली नाही की मला कोणतीही अधिकृत नोटीस आलेली नाही’, असंही त्यानं सांगितलं आहे. मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. या वयातही तरुणाला लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. नुकतेच त्यानं अतीउंचावर केलेल्या शीर्षासनाचे फोटोही शेअर केले होते. मॅरेथॉन रनर (Marathon Runner) म्हणूनही त्यानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनवाणी पायानं तो मॅरेथॉन धावतो. धावणं हे त्याचं पॅशन आहे. लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीही तो कार्यरत आहे. महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाबाबत (Breast Cancer) जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉनमध्येही त्याचा सक्रीय सहभाग असतो. अलीकडेच सोशल मीडियावरील लांब केस, कपाळावर कुंकू, नाक आणि कानातही दागिने घातलेले अशा वेशातल्या त्याच्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मिलिंदचे हे फोटो म्हणजे त्याच्या नव्या वेबसिरीजमधील (Web Series) भूमिकेचे असल्याचे स्पष्ट झालं आहे. लवकरच मिलिंद सोमण अल्ट बालाजीच्या (Alt Balaji) पौरुषपूर (Pourushpur) वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अन्नू कपूर, शिल्पा शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरीजच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
First published:

Tags: Viral photo, Web series

पुढील बातम्या