13 आॅक्टोबर : 51 वर्षाचा प्रसिद्ध सुपरमॉडल मिलिंद सोमण हा आपल्यापेक्षा 33 वर्षाच्या लहान मुलीला डेट करतोय. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव अंकिता लोखंडे आणि तिचं वय 18 असल्याची माहिती मिळतेय. हा जोडा मध्यंतरी मुंबईतल्या एका इव्हेंटमध्ये पहायला मिळाला. या इव्हेंटमध्ये मिलिंद आणि अंकिताला एकत्र पाहिल्याने सगळ्यांनाच त्यांच्या रिलेशनशिपचा अंदाज आला. मिलिंदच्या सोशल अकाऊंट्सवरही त्याचे आणि अंकिताचे फोटो झळकतायत.
असं बोललं जातय की अंकिता एक एयरहोस्टेस आहे. मिलिंद आणि तिची ओळख एका रॅम्प वॉकच्या दरम्यान झाली. याआधीही मिलिंद सोमणनं आपल्यापेक्षा लहान 21 वर्षाच्या शाहाना गोस्वामीला डेट केलं होतं पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेयलेनी जेम्पोईसोबत लग्न केलं होतं पण कालांतराने त्यांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये या दोघांनी घटस्फोट केला. मिलिंद सोमण नेहमीच ऍथलेटिक्सबद्दल नेहमी जागरुक असतो. फ्लोरिडामध्ये आयोजित अल्ट्रामॅन मॅरेथॉनमध्ये त्यांने 517 किलोमीटरची शर्यत जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
2015 मध्येही आयर्न मॅन चॅलेंज स्वीकारून त्याने खूप जोशाने हे चॅलेंज पूर्ण केलं होतं. यासाठी त्यांना आयर्न मॅन ऑफ इंडिया हा किताब देण्यात आला होता. एवढी प्रसिद्धी असतानाही हा सुपरमॉडल त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे जास्त चर्चेत येतो हेच खरं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा