नवरा असावा तर असा! मिलिंद सोमणनं लग्नातील UNSEEN VIDEO केला शेअर

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी मागील वर्षी 22 एप्रिलला लग्न केलं. यावेळी मिलिंद 53 वर्षांचा तर अंकिता 27 वर्षांची होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 12:57 PM IST

नवरा असावा तर असा! मिलिंद सोमणनं लग्नातील UNSEEN VIDEO केला शेअर

मुंबई, 23 एप्रिल : फिटने फ्रिक, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणनं 2018 मध्ये गर्लफ्रेंड अंकिता कोनवार हीच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला सोमवारी (22 एप्रिल) एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या कपलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अनसीन व्हिडिओ शेअर केला. सोबतच या व्हिडिओला रोमँटिक कॅप्शन देत त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक वर्षापूर्वी वयातील अंतरामुळे अंकिता आणि मिलिंदचं लग्नही फार चर्चेत राहीलं होतं.
 

Loading...

View this post on Instagram
 

This last year has been beautiful, but not as beautiful as you ❤ stay happy always @ankita_earthy !! . . #happyanniversary #mylove #youandme #forever . . . Thank you @moniapinto10 @face.entt


A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

लग्नातील विधींशी निगडीत असलेला हा व्हिडिओ शेअर करताना  मिलिंद सोमणनं लिहिलं, 'मागील एक वर्ष खूप सुंदर होतं पण तुझ्याएवढं सुंदर नाही. अंकिता नेहमी अशीच आनंदी राहा.' तर हाच अनसीन व्हिडिओ अंकितानंही आपल्या इस्टाग्रामवर शेअर केला. तिनं या व्हिडिओला, 'मागील एक वर्ष आनंदानं भरलेलं राहिलं, मला एका अशा व्यक्तीची सोबत मिळाली ज्याचं मी नेहमी स्वप्न पाहिलं होतं. तुझं माझ्यासोबत असणं माझ्या जगाला आणखी सुंदर बनवतं. माझा प्रत्येक दिवस तू अधिकाधिक सुंदर बनवतोस', असं कॅप्शन दिलं.
मिलिंद आणि अंकिताच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये ते दोघंही लग्नाच्या विधी पूर्ण करताना दिसत आहेत. यावेळीही त्यांच्यामधील रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. लग्नाच्या पोशाखात दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये लग्न, संगीत आणि मेहंदीच्या विधी कॅप्चर करण्यात आल्या आहेत. यावेळी मिलिंद आणि अंकिता डान्स करताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडिओवर चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी मागील वर्षी 22 एप्रिलला लग्न केलं. यावेळी मिलिंद 53 वर्षांचा तर अंकिता 27 वर्षांची होती. पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केल्यानंतर या दोघांनी 11 जुलै 2018ला स्पेनमध्ये 'barefoot wedding' केलं होतं. मिलिंदप्रमाणं अंकिताही फिटनेस फ्रिक असून सोशल मीडियावर हे कपल खूप सक्रिय असलेलं दिसून येतं.


वाचा : या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न


वाचा : अरबाज नाही तर मलायकानं केलं होतं लग्नासाठी प्रपोज, पण...

पाहा : Bharat Trailer- हर मुस्कुराते चेहरे के पीछे एक दर्द छिपा होता है.. वो ही दर्द आपको जिंदा रखता है...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...