20 सेकदांत 15 पुशअप्स; 81 वर्षीय आईचा VIDEO शेअर करीत मिलिंदने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

20 सेकदांत 15 पुशअप्स; 81 वर्षीय आईचा VIDEO शेअर करीत मिलिंदने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वयाच्या 81 व्या वर्षी साडी नेसून पुशअप्स मारताना तो VIDEO पाहून चाहत्यांचे डोळे मोठे झाले आहेत

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : फिटनेससाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण याला फिटनेसचं वेड कुठून आलं हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल. मिलिंदने आपल्या 81 वर्षीय आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याची आई पुशअप्स मारत आहे. साडीमध्ये त्यांनी 20 सेंकदात 15 पुशअप्स मारल्याचे व्हिडीओत  दिसून येत आहे. आईच्या 81 वाढदिवशी त्याने आईला शुभेच्छा देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोरवारही फिटनेट बाबत खूप आग्रही आहे. विशेष म्हणजे मिलिंद सोमण याची आई वयाच्या 81 व्या वर्षीही इतकी फिट असल्याचे पाहून चाहत्यांनी आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केलं आहे.

2018 मध्ये मिलिंद सोमणनं अंकिता कोनवारशी लग्न केलं. तेव्हापासून कोणत्याही फिटनेस इव्हेंटला हे दोघं एकत्र दिसतात. अंकिता सुद्धा त्याच्या इतकीच फिटनेस फ्रिक आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा एक रोमँटिक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

लॉकडाऊनदरम्यान मिलिंद चाहत्यांनासाठी अनेक फिटनेस टिप्स देत आहे. मिलिंदनं एप्रिल 2018 मध्ये अंकिताशी लग्न केलं होतं. अंकिता त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांच्यातील वयाच्या फरकावरुन त्यांच्यावर बरीच टिका सुद्धा झाली होती. मिलिंद फिटनेससंदर्भात विविध व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर करीत असतो.

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

First published: July 5, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या