20 वर्षानंतर मिलिंद इंगळे-सौमित्र पुन्हा एकत्र, रिलीज झालं नवं रोमँटिक गाणं

सध्या पाऊस पडतोय. हा पाऊस श्रावणातला आहे. आणि पुन्हा एकदा दोघं एकत्र आलेत 'तिला सांगा कुणी' हे गाणं घेऊन. युट्युबवर हे गाणं आताच रिलीज झालंय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 23, 2018 01:27 PM IST

20 वर्षानंतर मिलिंद इंगळे-सौमित्र पुन्हा एकत्र, रिलीज झालं नवं रोमँटिक गाणं

मुंबई, 20 आॅगस्ट : संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र म्हटलं की समोर येतो तो 'गारवा'. गारवालाही आता 20 वर्ष झालीयत. सध्या पाऊस पडतोय. हा पाऊस श्रावणातला आहे. आणि पुन्हा एकदा दोघं एकत्र आलेत 'तिला सांगा कुणी' हे गाणं घेऊन. युट्युबवर हे गाणं आताच रिलीज झालंय.

मध्यंतरी मिलिंदचं तुझ्या टपोरं डोळ्यात हे गाणंही आलं होतं. त्यानंतर आता हे गाणं. त्याबद्दल आम्ही मिलिंद इंगळे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ' गारवा अल्बमचा गारवा अजूनही कायमच आहे. पण हल्ली काळ बदललाय. कुणी अल्बम घेत नाही. म्हणून हे गाणं करायचं आम्ही ठरवलं. '

दाटुनी आले, तिला सांगा कुणी, मन गर्भार झाले, तिला सांगा कुणी... हे शब्द आहेत सौमित्रचे. आणि गाणं चित्रित झालंय ते मीरा जोशीवर. म्हणजे तुझं माझं ब्रेकअपमधली मेनका अगरवाल.  मिलिंद सांगतात, ' गाणं आठवणीतलं आहे. त्यामुळे मीरासोबत या व्हिडिओत मी स्वत: आहे. नायिकेची आठवण काढणारा नायक.'

शालेय पुस्तकात मिल्खा सिंग म्हणून छापला फरहानचा फोटो

'दोस्ताना'च्या सिक्वलमध्ये दिसणार 'ही' नवीन जोडी

साखरपुड्याच्या पार्टीनंतर निक निघाला अमेरिकेला, कॅमेऱ्यात कैद

मिलिंद या गाण्याच्या आठवणी सांगतात. ते म्हणाले, ' याचं शूटिंग झालं इगतपुरीला. वैतरणा इथे शूटिंग झालं. माझे शाॅट्स ढगाळ वातावरणात झाले. नायिकेसाठी पाऊस हवा होता. पण तो काही मिळेना. आम्ही दोन दिवस थांबून कॅमेरा घेऊन अक्षरश: पावसाची वाट पाहत होतो. शेवटी एकदाचा तो आला.'

हे गाणं गजलच्या फाॅर्ममध्ये आहे. मीरा जोशीनं यात स्वत: कोरिओग्राफीही केलीय.  तरल, सटल असा रोमान्स या गाण्यात पाहायला मिळतो. 20 वर्षांपूर्वी आलेल्या गारवानं तरुणांना वेडंपिसं केलं होतं. आता हे गाणं तरुणांना किती मोहात पाडतंय, ते लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close