मिका सिंगनं 'चौकीदार' सवी सिद्धूंना सिनेमात मिळवून दिलं काम

मिका सिंगनं 'चौकीदार' सवी सिद्धूंना सिनेमात मिळवून दिलं काम

सिनेमाची ऑफर देतना मीकानं सवी यांना सेक्युरिटी गार्डची नोकरी सोडून आपल्या टीमला जॉईन करण्यास सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : 'गुलाल', 'पटियाला हाऊस' आणि 'ब्लॅक फ्रायडे' यांसारख्या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले सवी सिद्धू हे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यावर बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांनी यावर दुःख व्यक्त केलं. या वृत्तानंतर मात्र सवी यांचं नशीब रातोरात बदललं आहे. स्टार कलाकारांसोबत काम केलेला हा अभिनेता सध्या त्याच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत असल्याचं समजल्यानंतर गायक मिका सिंग सवी सिद्धूंच्या मदतीला धावून आला. मिकानं त्याचा आगामी सिनेमा 'आदत'मध्ये सवी यांना एक भूमिका ऑफर केली आहे.

'आदत'मध्ये अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिका सिंग या सिनेमाचा निर्माता आहे. या सिनेमाची ऑफर देताना मिकानं सवी यांना सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडून आपल्या टीमला जॉईन करण्यास सांगितलं. याबाबत सवी यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'मिका सिंग माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती माझ्या मित्रांनी मला दिली. त्यानंतर काही दिवसातच मिका सिंगचा मला कॉल आला. पण मला वाटलं कोणीतरी मस्करी करत आहे. म्हणून मी आधी त्या कॉलकडे दुर्लक्ष केलं. पण मिकानं मला सांगितलं की तुम्ही आता ही नोकरी करणार नाही. तुम्ही माझ्या सिनेमामध्ये काम करणार आहात आणि दुसऱ्याच दिवशी त्यानं माझ्यासाठी गाडी पाठवून त्याच्याकडे बोलावून घेतलं. मला नवे कपडे आणि जेवण दिलं. आता मी पुढील 10 दिवसांत मिकासोबत काम करायला सुरुवात करणार आहे.

मिका सिंगनं सवींबाबत बोलताना सांगितलं, 'सवींची कथा ऐकल्यावर मी त्यांची मदत करण्याचं ठरवलं होतं. एका टॅलेंटेड अभिनेत्याला आज अशा प्रकारचं काम करावं लागत आहे, याचं मला वाईट वाटलं. सिनेसृष्टीचा एक भाग असल्याच्या नात्यानं मी त्यांना मदत करू इच्छित होतो. पण त्यांना बॉलिवूडमधील कोणीच मदत करण्यासाठी पुढे आलं नाही हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं. त्यांच्यासाठी सिनेमातील एक छोटीशी भूमिकाही सेक्युरिटी गार्डची नोकरी करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे.' मिका सिंगनं 'आदत'चे दिग्दर्शक भूषण पटेल आणि विक्रम भट यांना सिनेमाच्या स्क्रीप्टमध्ये काही बदल करण्यासाठी सांगितलं आहे. ज्यातून सवींची भूमिका या सिनेमाशी जोडली जाईल. तसेच मिका सवींना अ‍ॅक्टिंग कोच म्हणून जॉब देण्यासाठीही प्रयत्न करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading