मिका म्हणतो, 'हमारा पाकिस्तान'

मिका म्हणतो, 'हमारा पाकिस्तान'

पण पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटल्यामुळे आक्षेप घेतले जात आहेत.

  • Share this:

24 जुलै : पॉप गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादात अडकलाय. यावेळी त्याने चक्क पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटलंय.

12 ऑगस्टला अमेरिकेत मिका सिंग स्टेज शो करणार असल्याचं त्यानं जाहीर केलंय. न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच त्याने  एक व्हिडिओ बाईट दिला आहे. त्यामध्ये मिकाने पाकिस्तानचा उल्लेख 'हमारा पाकिस्तान' असा केलाय. या व्हिडिओमध्ये तो भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हा शो करत असल्याचं म्हणतोय. तसंच तो या शोसाठी एकही पैसा मानधन घेत नसल्याचं या व्हिडिओतून कळतंय.

पण पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटल्यामुळे आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे भारतीय जनतेत संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 11:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading