Home /News /entertainment /

Big Boss 15 : मायशा अय्यर, ईशान सेहगलची किसींगची बरसात; दोघं दिसले एकाच चादरीत

Big Boss 15 : मायशा अय्यर, ईशान सेहगलची किसींगची बरसात; दोघं दिसले एकाच चादरीत

बिग बॉसच्या घरात इंटीमेसीच्या बाबतीत मायशा अय्यर (Miesha Iyer) आणि इशान सहगल (Ieshaan Sehgaal) यांची नावं सर्वात जास्त चर्चेत आहेत. दिवस असो वा रात्र, हे दोघे प्रत्येक वेळी एकमेकांना चिकटून बसलेली दिसतात.

  नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : बिग बॉस 15 च्या (Bigg Boss 15 Latest Update) पहिल्याच आठवड्यात यंदा चांगलीच धमाल चालू आहे. या हंगामात पहिल्यांदाच पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धक एकाचवेळी नॉमिनेट झाले आहेत. याशिवाय पहिल्याच आठवड्यात जबरदस्त वाद होताना दिसले आणि काही लवस्टोऱ्याही आता दिसत आहेत. तर, इंटीमेसीविषयी बोलायचे झाल्यास त्याबाबतीतही या शोने सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  बिग बॉसच्या घरात इंटीमेसीच्या बाबतीत मायशा अय्यर आणि इशान सहगल (Miesha Iyer and Ieshaan Sehgaal)  यांची नावं सर्वात जास्त चर्चेत आहेत. दिवस असो वा रात्र, हे दोघे प्रत्येक वेळी एकमेकांच्या अगदी जवळ बसलेले दिसतात. मायशा आणि ईशान (Miesha Iyer and Ieshaan Sehgaal Kiss) अनेक वेळा एकमेकांना चुंबन (Miesha Iyer and Ieshaan Sehgaal Liplock) देताना दिसले आहेत. शेवटच्या एपिसोड्समध्ये तर ते अनेकदा ते इंटीमेट झालेले दिसले आहेत. हे वाचा - Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss! VIDEO पाहून भडकले यूजर्स दोघं एकाच बेडवर याशिवाय ईशान आणि मायशा (Miesha Iyer and Ieshaan Sehgaal) एकमेकांसोबत बेड शेअर करताना दिसले आहेत. हे दोघे नेहमी एकमेकांना मिठी मारताना दिसतात, या दोघांचे अनेक इंटीमेट फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. रात्री उशीरा प्रसारित होणाऱ्या बिग बॉसमध्ये कार्यक्रमातील अशा गोष्टी सतत टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. हे वाचा - Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात हास्याचा तडका लावणारी तेजस्वी प्रकाश रियल लाईफमध्ये आहे फारच ग्लॅमरस, पाहा फोटो ईशानने सांगितली ही गोष्ट OTT वर दोघांची ही केमिस्ट्री अधिक खुलेपणाने दाखवली जात आहे. ईशान सहगल मायशा अय्यरसोबत एकाच चादरीत झोपलेला दिसला होता. अलीकडेच तो म्हणाला की, 'मला खरोखरंच वाटतं की, आमच्या दोघांचं नातं खूप घट्ट आहे आणि मी फक्त 8 दिवसच तिच्यासोबत आहे, असे मला वाटतच नाही. मला ती खूपच आवडत आहे'.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg Boss OTT

  पुढील बातम्या