लोकांना वाटतं मी अजुनही 'पॉर्न' इंडस्ट्रीत काम करते, पण...

लोकांना वाटतं मी अजुनही 'पॉर्न' इंडस्ट्रीत काम करते, पण...

लोकांचे Adult Film Industry बद्दल अनेक गैरसमज आहेत. माझ्या कुटुंबीयांना जेव्हा त्याबद्दल कळालं तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर : पॉर्न इंडस्ट्रीसोडून चित्रपटक्षेत्रात आलेली स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) ही कायम चर्चेत असते. कधी आपल्या वक्तव्यामुळे किंवा सोशल मीडियावर ती टाकत असलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपलं आधीचं पॉर्न इंडस्ट्रीतलं करिअर, तिथं काम, त्यातून मिळणारा पैसा आणि ती इडस्ट्री का सोडली अशा सर्व विषयांवर तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. नुकतीच मिया खलिफाने (Mia Khalifa) लग्न करण्याचीही घोषणा केली होती त्यामुळे ती चर्चेत आली  होती. मिया खलिफाबद्दल Vice ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्यात अनेक गोष्टी तिने सांगितल्या आहेत. मिया म्हणाली, पॉर्न इंडस्ट्रीत मी फक्त तीन महिनेच काम केलं. लोकांना वाटतं त्यातून मी कोट्यवधी डॉलर्स कमावले असतील. पण माझी कमाई ही फक्त $12,000 डॉलर्स म्हणजेच फक्त 8.5 लाख एवढीच झालीय.

VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

लोकांचे Adult Film Industry बद्दल अनेक गैरसमज आहेत. मी अजुनही या इंडस्ट्रीत काम करते असं लोकांना वाटतं. मात्र मी त्यात फक्त तीनच महिने काम केलं. माझ्या कुटुंबीयांना जेव्हा त्याबद्दल कळालं तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मी ते काम सोडून दिलं असंही तिने सांगितलं.

लग्नाआधीच मिया प्रेग्नंट?

मिया तिचा बॉयफ्रेंड रॉबर्ट सॅण्डबर्ग (Robert Sandberg) याच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे. मार्च महिन्यातच मिया आणि रॉबर्टची Engagement झाली होती. Engagement नंतर मिया आणि रॉबर्टनी या दोघांनी 2021मध्ये लग्न करण्याची घोषणा केली होती. मात्र मियाने आता लग्न 6 महिने आधीच करण्याचं जाहीर केलंय.

लग्नाची तारीख 6 महिने आधी कमी केल्याने मिया प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती. मिया प्रेग्नंट असल्यामुळे तिने लग्न आधीच करण्याचा निर्णय घेतला असं गॉसिप चर्चेत होतं.या गॉसिपवर आता मियाने ट्विट करत सगळ्यांनाच उत्तर दिलंय.

मी प्रेग्नंट नाही, केवळ रॉबर्ट त्याच्या कामात व्यस्त असल्याने लग्नाची तारीख बदलल्याचं तिने सांगितलंय. मिया खलिफाचं हे दुसरं लग्न असून 2011मध्ये तिने आपल्या वर्गमित्रासोबत लग्न केलं होतं. मात्र ते फक्त 5 वर्षच टिकलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 10:18 PM IST

ताज्या बातम्या