• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही शिवाजी पार्क!

जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही शिवाजी पार्क!

हल्ली भारतात रिलीज झालेले मराठी चित्रपट परदेशातही रिलीज केले जातायत. मराठी लोकांची खूप मोठी लोकसंख्या अनेक देशांमध्ये आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 आॅक्टोबर : मराठी चित्रपटांची भरारी आता सातासमुद्रापार होतेय. हल्ली भारतात रिलीज झालेले मराठी चित्रपट परदेशातही रिलीज केले जातायत. मराठी लोकांची खूप मोठी लोकसंख्या अनेक देशांमध्ये आहे. त्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकही मिळतो. महाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात प्रदर्शित होणार आहे. दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घोडदौड सुरू केली आहे. येत्या १ नोव्हेंबरला जर्मनीतील म्युनिचमध्ये तर शनिवार ३ नोव्हेंबरला स्वीडनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शुक्रवार २ नोव्हेंबर आणि शनिवार ३ नोव्हेंबरपासून मी शिवाजी पार्क अमेरिकेतील न्यू जर्सी, डल्लास,  बे एरिया, फिलाल्डेफिया, पोर्टलॅण्ड, सियाटेल, अटलांटा, हॉस्टन या शहरांतील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट आहे. मराठीतील पाच दिग्गज कलाकार आणि तितकेच ताकदीचे दिग्गज दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला चित्रपट परदेशातील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ आणि ‘महेश मांजरेकर मुव्हीज’च्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात विक्रम गोखले,  सतीश आळेकर,  अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दीप्ती लेले, मंजिरी फडणीस, दीप्ती धोत्रे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. VIDEO - या कारणासाठी 'CID'ला घ्यावा लागतोय ब्रेक!
  First published: