म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्याण पडालांची सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या

म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्याण पडालांची सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या

राष्ट्रपती पारितोषिक मिळविलेल्या म्होरक्या चित्रपटाच्या निर्मात्याला खासगी सावाकरकीच्या जाचामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, 20 मे : राष्ट्रपती पारितोषिक मिळविलेल्या म्होरक्या चित्रपटाच्या निर्मात्याला खासगी सावाकरकीच्या जाचामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी घेतलेल्या कर्जाच्या अव्वाच्यासव्वा व्याजदराला कंटाळून निर्माता कल्याण पडाल यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे खासगी सावकारीला चाप केव्हा बसणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

म्होरक्या या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यामुळे म्होरक्या टीमचा आनंद गगणात मावत नव्हता मात्र कल्याण पडाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा आनंद औट घटकेचा ठरला.

कल्याण यांनी राज्याचे गृहमंत्री, सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे तसेच जेलरोड पोलीस स्टेशनकडे याबाबत तक्रारी अर्जही दिला होता. मात्र त्यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे खासगी सावकार श्रीनिवास संगा आणि संतोष बसुदे यांच्या जाचाला कंटाळून अखेर त्यांनी आत्महत्या केली.

काय आहे हे प्रकरण ?

- श्रीनिवास संगा या खासगी सावकाराकडून कल्याण यांनी १ लाख रुपये व्याजाने घेतले होते.

-  त्याबदल्यात संगा यांनी १ वर्षानंतर ९ लाखाची मागणी सुरू केली.

- श्रीनिवास संगा याला २०१५ साली दोन वर्षासाठी जिल्ह्यातून  तडीपार करण्यात आले होते.

- त्याच्यावर लोकांना मारहाण करणे, हाफ मर्डर, खासगी सावकारी आदी तक्रारी आहेत.

- संतोष बसुदे याच्याकडूनही कल्याण यांनी १ लाख रुपये व्याजाने घेतले होते.

- त्याबदल्यात बसुदे याने कल्याण यांना ११ लाखाची मागणी सुरु केली होती.

- याशिवाय पैसे देत नाही म्हणून बसुदे याने कल्याण यांच्याकडून त्यांचे वडिलोपार्जित दुकानाची नोटरी करुन घेतली.

सोलापुरात खासगी सावकारकीला कंटाळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या म्होरक्याच्या निर्मात्यावरही ही वेळ आली. धक्कादायक बाब म्हणजे तक्रारी अर्ज करूनही पोलीस प्रशासन खासगी सावकारांना पाठीशी घालेतंय. त्यामुळे भविष्यात तरी प्रशासनाने कडक पावले उचलीत खासगी सावकारकीला चाप लावायला हवा अन्यथा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना समाज मुकल्याशिवाय राहणार नाही.

 

First published: May 20, 2018, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading