#MeeToo प्रकरणातून विकास बहल सुटला, पुन्हा एकदा झाला सुपर 30 चा दिग्दर्शक

फँटम फिल्म्समध्ये विकासचे पार्टनर अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनीही ही घटना घडल्याचं मान्य केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 02:10 PM IST

#MeeToo प्रकरणातून विकास बहल सुटला, पुन्हा एकदा झाला सुपर 30 चा दिग्दर्शक

मुंबई, 01 जून- बॉलिवूड दिग्दर्शक विकास बहलला लैंगिक शोषण प्रकरणात क्लीन चिट मिळाली असून त्याने हृतिक रोशनच्या सिनेमातून कमबॅक केलं आहे. २०१८ मध्ये सुरू झालेल्या MeeToo कॅम्पेनमधून विकास बहलचं नाव समोर आलं होतं. २०१५ मध्ये आलेल्या बॉम्बे वेलवेट सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका महिला सहकाऱ्यासोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. फँटम फिल्म्समध्ये विकासचे पार्टनर अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनीही ही घटना घडल्याचं मान्य केलं होतं. यानंतर विकासने त्याचे साथीदार अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मंटेनावर चारित्र्य खराब करण्याचा आरोप करत १० कोटी रुपयेही मागितले.

जोरदार हवेने 'या' अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस

विकासवर लैंगिक शोषणाचा आरोप लागल्यामुळे त्याच्यावर सिनेसृष्टीत बंदी घालण्यात आली होती. पण आता त्याच्यावरची ही बंदी उठवली असून हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमातून दिग्दर्शक म्हणून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

...म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न


Loading... 

View this post on Instagram
 

समय बदल रहा है। Welcome to #Super30


A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रिलायन्स एण्टरटेनमेन्टने विकासवर करण्यात आलेल्या आरोपांवर एक समिती नेमली. यानंतर समितीने विकासची निर्दोष सुटका केली. विकासची सर्व आरोपांतून सुटका झाल्यामुळे प्रोडक्शन हाउसचे सीईओ शिबाशीश सरकारने सुपर ३० सिनेमाचा दिग्दर्शक विकासच असेल याची घोषणा केली. तसेच पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाच्या ट्रेलरमध्येही विकासचं नाव असेल.

जान्हवी कपूरकडे असते की गुलाबी बाटली, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

सुपर ३० सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ही बिहारमधील एका कोचिंग संस्था चालवणाऱ्या गणितीतज्ज्ञ आनंद कुमारची आहे. आनंद कुमारची भूमिका हृतिक रोशन साकारत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आतापर्यंत अनेकदा बदलण्यात आली. मात्र आता १२ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बायकोला खुश करण्याच्या नादात रितेश देशमुख झाला ट्रोल, लोकांनी विचारलं ‘माणूस आहेस की पोपट?’

VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Vikas Bahl
First Published: Jun 1, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...