• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL

'मेरे संय्या सुपरस्टार' फेम नवरीचा पुन्हा धुमाकूळ, नवीन VIDEO होतोय VIRAL

श्वेता ताजने (shweta tajane) या मुलीने ‘मेरे संय्या सुपरस्टार’ या गाण्यावर अक्षरशः धम्माल केली होतं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral On Social Media) झाला होता.

 • Share this:
  मुंबई, 8 मे : अलीकडेचं एक मराठमोळी (Maharashtriyan Bride) नवरी खुपचं चर्चेत आली होती. आणि कारणही तसंच खास होतं. स्वतःच्याच लग्नात या मुलगीने धमाकेदार डान्स करत एन्ट्री घेतली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral On Social Media) झाला होता. या मुलीने ‘मेरे संय्या सुपरस्टार’ या गाण्यावर गाण्यावर अक्षरशः धम्माल केली होतं. तिची ही एन्ट्री आजही लोकांच्या लक्षात राहिली आहे. या मुलीचं नाव श्वेता ताजने(Shweta Tajane)  असं आहे. नुकताच श्वेताचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सुद्धा ती आपलं कौशल्य दाखवताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

  सोशल मीडिया एक असं माध्यम आहे. ज्यावरून लोक क्षणार्धात लोकप्रियता मिळवू शकतात. आजपर्यंत आपण अशी कित्येक उदाहरण पहिली आहेत. अलीकडे लोक आपल्या खाजगी आयुष्यातील प्रत्येक क्षण खास बनविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात.
  View this post on Instagram

  A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

  नोव्हेंबर मध्ये एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड पसंत करण्यात आला होता. ती मुलगी म्हणजे श्वेता ताजने. नवरी मुलीने फक्त खाली मान घालून मंडपात बसावे या वृत्तीच्या लोकांना तिने चांगलीच चपराक लावली होती. आपल्या आयुष्यातील या सर्वात महत्वाच्या दिवसाला आपण कस खास बनवू शकतो, हे तिनं दाखवलं होतं. (हे वाचा:संजय आणि सुनील दत्त यांच्यात होतं सोशल डिस्टन्स? रिकाम्या खुर्चीनं वेधलं लक्ष  ) श्वेता एक उत्मम डान्सर आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण पुन्हा एकदा श्वेताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये ती ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ या गाण्यावर अफलातून डान्स करताना दिसत आहे.  या व्हिडीओमुळे श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या निमित्ताने श्वेताचा आधीच व्हिडीओ आणि आत्ताचा व्हिडीओ दोन्हीही व्हायरल होतं आहेत. श्वेताने नोव्हेंबर मध्ये संकेत शिंदे या मुलाशी लग्न केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published: