'जागतिक टॉयलेट दिना'ला 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' पोस्टर रिलीज

'जागतिक टॉयलेट दिना'ला  'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' पोस्टर रिलीज

अनेक हिट सिनेमांचा रेकॉर्ड असलेले दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे.

  • Share this:

20 नोव्हेंबर : आपल्या सगळ्यांना उत्सुकता असलेल्या 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' या प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर अखेर रिलीज करण्यात आलं आहे. काल झालेल्या 'जागतिक टॉयलेट दिना'निमित्त हा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये एक आई तिच्या मुलाला घेऊन टॉयलेटजवळ उभी आहे.

अनेक हिट सिनेमांचा रेकॉर्ड असलेले दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. या सिनेमाबद्दल राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितलं की, 'मी स्वत: दिल्लीचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सिनेमांत दिल्ली दाखवली आहे.'

'रंग दे बसंती', 'दिल्ली 6', आणि 'भाग मिल्खा भाग' या सिनेमांचं शूटिंग दिल्लीत केलं होतं. पण या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग मात्र मुंबईत होणार आहे.

हा सिनेमा लोक आणि त्यांच्या आपापसातल्या संबंधावर आधारित आहे. आपल्या खऱ्या आयुष्यातले अनेक पैलू या सिनेमात पहायला मिळणार आहेत.

महात्मा गांधींच्या विचारांशी प्रेरित असा हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नसून फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात येणार आहे.

'महात्मा गांधींनी स्वच्छतेसाठी खूप जनजागृती केली हे खूप कमी लोक जाणतात. त्यामुळे हा सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे,' असंही ते म्हणाले.

समाजप्रबोधन आणि समाजातील समस्यांवरचे सिनेमे प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. त्यामुळे राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा सिनेमाही हिट होणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 04:44 PM IST

ताज्या बातम्या