Mere Pyare Prime Minister- ६ वर्षांच्या कन्हैया कानूने ट्विटरवर नरेंद्र मोदींना विचारले प्रश्न, तुम्हीही एकदा वाचाच

तुमचं तुमच्या आईवर फार प्रेम आहे ही गोष्ट मला फार आवडते. जसं माझ्या आईसोबत झालं तसं तुमच्या आईसोबत झालं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं?

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 06:55 PM IST

Mere Pyare Prime Minister- ६ वर्षांच्या कन्हैया कानूने ट्विटरवर नरेंद्र मोदींना विचारले प्रश्न, तुम्हीही एकदा वाचाच

मुंबई, २० फेब्रुवारी २०१९- राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर या आगामी सिनेमातील कान्हू या सहा वर्षांच्या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ट्विटरवर मोदी यांना कान्हूने सद्य परिस्थितीवर अनेक प्रश्न विचारले असून त्यांच्याकडून उत्तराची वाट पाहत असल्याचंही म्हटलं आहे.

मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर या सिनेमात उघड्यावर शौच आणि स्वच्छता या समस्यांवर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. कन्हैया कान्हू या सहा वर्षाच्या मुलाला आपल्या आईसाठी शौचालय बांधण्याची इच्छा असते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत कान्हूने लिहिले की, ‘तुमचं तुमच्या आईवर फार प्रेम आहे ही गोष्ट मला फार आवडते. माझंही माझ्या आईवर फार प्रेम आहे. जसं माझ्या आईसोबत झालं तसं तुमच्या आईसोबत झालं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं?’

Loading...

यानंतर अजून एक ट्वीट करत कान्हूने लिहिले की, ‘मला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्हाला भेटण्यासाठी मोठं माणूस व्हावं लागेल का? तुम्ही माझ्यासारख्या मुलांचे प्रश्न ऐकणार नाही का?’ तिसऱ्या ट्विटमध्ये कान्हूने लिहिले की, ‘दहशतवादी कसे तयार होतात. माझी आई म्हणते की कोणाला मारणं वाईट गोष्ट आहे. त्यांच्या आईने त्यांना कधी हे सांगितलं नसेल का? तुम्हाला काय वाटत?’मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कान्हूचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याला आईच्या सुरक्षेसाठी शौचालय बांधायचे असते. त्याचा शौचालय बांधायचा संघर्ष त्याला पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतो.राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसिका आगाशे, सोनिया अल्बिजुरी आणि नचिकेत पूर्णापत्रे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. शंकर- एहसान- लॉय यांचं संगीत असलेल्या या सिनेमाची गाणी गुलझार यांनी लिहिली आहेत. येत्या १५ मार्चला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

VIDEO: आर्ची देतेय 12 वीची परीक्षा; पाहिलं का तुम्ही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...