'मेरे पास माँ है' डायलाॅग शशी कपूरसाठी लिहिला नव्हताच

'मेरे पास माँ है' डायलाॅग शशी कपूरसाठी लिहिला नव्हताच

'मेरे पास माँ है' हा अजरामर, आयकाॅनिक डायलाॅग. शशी कपूर यांना दिवारमध्ये हा डायलाॅग मिळाला आणि त्यांची भूमिका कायमचीच लक्षात राहिली.

  • Share this:

05 डिसेंबर : 'मेरे पास माँ है' हा अजरामर, आयकाॅनिक डायलाॅग. शशी कपूर यांना दिवारमध्ये हा डायलाॅग मिळाला आणि त्यांची भूमिका कायमचीच लक्षात राहिली. पण हा डायलाॅग शशी कपूरसाठी लिहिलाच नव्हता. मग तो कसा मिळाला त्यांना?

सुरुवातीला या सिनेमासाठी अमिताभऐवजी शत्रुघ्न सिन्हा होते. तर शशी कपूरच्या ठिकाणी नवीन निश्चल. पण शत्रुघ्न सिन्हांनी सिनेमातून माघार घेतली. त्यांच्या जागी अमिताभ बच्चननी ती भूमिका साईन केली.

अमिताभ आणि नवीन निश्चल यांचा याआधीचा सिनेमा काही चालला नाही. म्हणून नवीन निश्चल यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय चोप्रांनी घेतला. आणि त्या जागी शशी कपूर आले.

शशी कपूर यांचा मेरे पास माँ है हा डायलाॅग ऐतिहासिक ठरला. आजही शशी कपूरना आदरांजली वाहताना सर्वांना आठवतो तोच डायलाॅग.

First published: December 5, 2017, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading