मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मेंदीचा कोन लाखांच्या घरात; कतरीना कैफच्या लग्नाचा घाट पाहून हैराण व्हाल!

मेंदीचा कोन लाखांच्या घरात; कतरीना कैफच्या लग्नाचा घाट पाहून हैराण व्हाल!

ही काही 15 रुपयांच्या कोनमधली मेंदी नसून याची स्वत:ची वेगळी खासियत आहे.

ही काही 15 रुपयांच्या कोनमधली मेंदी नसून याची स्वत:ची वेगळी खासियत आहे.

ही काही 15 रुपयांच्या कोनमधली मेंदी नसून याची स्वत:ची वेगळी खासियत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : कतरीना कैफ सध्या स्वत:च्या लग्नाच्या वृत्तामुळे मोठी चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कतरीना पुढल्या महिन्यात राजस्थान सिक्स सेंस बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये विक्की कौशल (Vicky Kaushal) सोबत लग्न करणार आहे. ताज्या रिपोर्टनुसार कतरीना कैफ (Katrina Kaif) लग्नात एका स्पेशल प्रकारची मेंदी हातात लावणार आहे.

ही मेंदी अभिनेत्रीसाठी राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून ऑर्डर करण्यात आली आहे. याला सोजत मेंदी म्हटलं जातं. बॉलीवूड लाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोजतमधील कारागिरांची मेंदी विशेष पद्धतीने आणि केमिकलचा वापर न करता तयार केली जाते. ही मेंदी कतरीनाला पाठवण्यात येईल. सोजतमधील मेंदी वेंडरनुसार, या मेंदीची किंमत 50 हजार ते 1 लाखांपर्यंत आहे.

सांगितलं जात आहे की, राजस्थानमध्ये लग्नाच्या पूर्वी कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज करतील. अभिनेत्रीच्या जवळील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात राजस्थानमध्ये रॉयल वेडिंगपूर्वी दोघे कोर्ट मॅरेज करतील. लग्नाच्या वृत्तावर अद्यापही कतरीना आणि विक्की यांच्या सह त्यांच्या कुटुंबीयांनीही मौन पाळलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरीना कैफ आणि  (Katrina Kaif) विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी दोघेही सेलिब्रिटी मॅनेजर रेशमा शेट्टीच्या ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्ताने पोहोचले होते. दोघेही आपल्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिजाइनर सब्यसाचीकडून डिजाइन करून घेत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कतरीना आता 'टाइगर 3' मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Katrina kaif, Vicky kaushal