मोहम्मद रफींच्या पुण्यतिथीनिमित्त काही आठवणी

31 जुलै 1980 साली या संगीतातील ताऱ्याने अखेरचा श्वास घेतला. गायक म्हणून मोहम्मद रफी कसे होते हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. पण गायकापलीकडचे मोहम्मद रफी माणूस म्हणून कसे होते?

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 04:24 PM IST

मोहम्मद  रफींच्या पुण्यतिथीनिमित्त काही आठवणी

31 जुलै: आपल्या गाण्यांनी साऱ्या देशाला वेड लावणाऱ्या  मोहम्मद रफींची  आज पुण्यतिथी. 36 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये  मोहम्मद रफींनी   6 फिल्मफेअर, एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री असे मानाचे पुरस्कार मिळवले. 31 जुलै 1980 साली या संगीतातील ताऱ्याने अखेरचा श्वास घेतला. गायक म्हणून मोहम्मद रफी  कसे होते हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. पण गायकापलीकडचे ते माणूस म्हणून कसे होते?

रफींच्या आयुष्यातल्या 10 महत्त्वाच्या घटना

1. मोहम्मद रफी यांचा  जन्म 1924 साली कोटला सिंग सुलतान या पंजाबातल्या छोट्याशा गावी झाला होता. 1932 साली त्यांच्या कुटूंबाने लाहोरला स्थलांतर केले.

2. आपल्या होणाऱ्या जावयाच्या मदतीने  मोहम्मद रफी  मुंबईस आले. काही काळ स्ट्रगल केल्यानंतर  मोहम्मद  रफी यांनी आपलं पहिलं गाणं श्याम सुंदरच्या गाव की गोरी या चित्रपटासाठी गायलं.

3. लोकांना मोहम्मद रफी यांचा  आवाज शम्मी कपूरच्या आवाजाला सूट होतो असं वाटायचं. पण मोहम्मद रफी  यांचा आवडता हिरो शम्मी कपूर नाही तर राजेंद्र कुमार होता.

Loading...

4. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा मोहम्मद  रफी यांचा  पहिल्या पत्नीने पाकिस्तानला जायचा निर्णय घेतला. पण आपल्या संगीताच्या प्रेमाखातर  मोहम्मद रफी  भारतातच राहायचा निर्णय घेतला. त्यानंतर आपल्या पहिल्या पत्नीपासून  मोहम्मद रफी  वेगळे झाले आणि त्यांची पहिली पत्नी पाकिस्तानात निघून गेली.

5.एकदा संजय गांधी किशोर कुमारांवर प्रचंड नाराज झाले होते. तेव्हा त्यांना मनवण्यासाठी आणि किशोर कुमारांना त्यांच्या रागापासून वाचवण्यासाठी  मोहम्मद रफी स्वत:हून संजय गांधींना भेटले.

6.31 जुलैला मोहम्मद रफी यांनी  या जगाचा निरोप घेतला.मृत्यूनंतर किशोर कुमार मोहम्मद रफींच्या  पायाशी बसून दोन तास ढसाढसा रडत होते.

7.  मोहम्मद रफी स्वभावानेही पार दयाळू होते. एकदा पैसे नसल्यामुळे आपल्या कॉलनीत राहणाऱ्या एका विधवेला त्यांनी संघर्ष करताना पाहिलं. त्यानंतर दरमहा अज्ञात व्यक्तीच्या नावाने ते तिला पोस्टाने पैसे पाठवत होते.

8. मोहम्मद रफी यांचे संगीतावर प्रचंड प्रेम होतं आणि गाण्याला ते कधीही पैशात तोलत नसत. जेव्हा लता मंगेशकरसह अनेकांनी त्यांना त्यांचं मानधन वाढवायला सांगितलं तेव्हा ते नाराज झाले आणि लता मंगेशकरसोबत पुन्हा गाणं न गायचा निर्णय त्यांनी घेतला.

9.  मोहम्मद रफी  त्यांच्या करिअरमध्ये कायम नं 1 होते. मन्ना डे यांनी हे कबूल केलं की  मोहम्मद  रफी  असताना मन्ना डे आणि किशोर कुमार कायम दुसऱ्या नंबरसाठी लढायचे.

10. मोहम्मद रफी यांच्यावर लोकांचं प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत 10,000 लोक सामील झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...