मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सना खानची पोलखोल, ब्रेकअपनंतर मेल्विन लुईसनं शेअर केलं कॉल रेकॉर्डिंग

सना खानची पोलखोल, ब्रेकअपनंतर मेल्विन लुईसनं शेअर केलं कॉल रेकॉर्डिंग

अभिनेत्री सना खान डान्स कोरिओग्राफर मेल्विन लुइससोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही दिवसांपूर्वी तिनं तिचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं.

अभिनेत्री सना खान डान्स कोरिओग्राफर मेल्विन लुइससोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही दिवसांपूर्वी तिनं तिचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं.

अभिनेत्री सना खान डान्स कोरिओग्राफर मेल्विन लुइससोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही दिवसांपूर्वी तिनं तिचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 08 मार्च : टीव्ही आणि सिने अभिनेत्री सना खान मागच्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. सना खान मागच्या बऱ्याच काळापासून डान्स कोरिओग्राफर मेल्विन लुइससोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती अनेकदा त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असे. पण काही दिवसांपूर्वी तिनं तिचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. पण या सर्वावर मेल्विन पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत स्वतःची बाजू मांडली आहे.

मेल्विन लुईसनं त्याच्या इन्स्टाग्रामवर सना खानचा एक कॉल रेकॉर्ड शेअर केला आहे ज्यात ती स्वतःच, ‘तुझी इमेज खराब करण्याचा माझा प्लान होता असं म्हणताना दिसत आहे.’ मेल्विननं शेअर केलेल्या या रेकॉर्डिंगमध्ये सना खान आणि मेल्विन एकमेकांशी बोलताना ऐकू येत आहे. यात सना खान म्हणते, मी तुला अपमानित केलं कारण असं करुन मला सार्वजनिक ठिकाणी आनंद मिळत आहे. यावर मेल्विन पूर्ण विश्वास होता की, तुझा असाच काही प्लान असेल. यावर सना म्हणते हो माझा हाच प्लान होता.

स्वतःच्या नावावरच सिनेमा हिट करतात या अभिनेत्री, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

सनासोबतच्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग शेअर करताना मेल्विननं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, तू माझी खिल्ली उडवली, माझ्या धर्मावरुन आणि स्किन कलरवरून बोललीस एवढंच नाही तर माझ्या फॅमिलीचीही खिल्ली उडवली. तु तुझं काम केलंस. मला वाटतं तुला खूप आनंद मिळाला असेल. मेल्विनच्या या खुलाशानंतर सर्वच हैराण झाले आहेत. मात्र यावर सना खानची कोणचीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

जीन्सवर साडी हा काय प्रकार, प्रार्थना बेहरेचं हे हटके फोटोशूट पाहिलं का?

" isDesktop="true" id="440211" >

काही दिवसांपूर्वी सना खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं मेल्विन लुईसशी ब्रेकअप का केलं हे सांगितलं होतं. याशिवाय तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर सुद्धा एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं लिहिलं, ‘मला जेव्हा समजलं की त्याच्यामुळे त्याची एक विद्यार्थिनी प्रेग्नन्ट होती. त्यावेळी मला खूप दुःख झालं होतं. तो त्याच्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करत असे. त्याच्याबद्दल जेव्हा मला हे सर्व समजलं त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या याच सवयीमुळे तो अद्याप स्ट्रगल करत आहे. शेवटी देव शिक्षा देतोच.’ याशिवाय एका मुलाखतीत सुद्धा सनानं मेल्विनला विश्वासघातकी आणि खोटा म्हटलं होतं. त्यासोबतच मेल्विननंकशाप्रकारे तिचा विश्वासघात केला हे सुद्धा सांगितलं.

सलमाननं शेअर केले आयतसोबतचे खास क्षण, पाहा मामा-भाचीचा हा क्यूट VIDEO

First published:

Tags: Bollywood