दीपिका भेटणं नशिबाची गोष्ट, म्हणतेय मेघना गुलजार

दीपिका भेटणं नशिबाची गोष्ट, म्हणतेय मेघना गुलजार

दीपिका पदुकोण लवकरच मेघना गुलजारच्या छपाक या सिनेमाचं शूटिंग करणार आहे. हा सिनेमा अॅसिड हल्ला झालेल्या स्त्रीवर आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च : दीपिका पदुकोण लवकरच मेघना गुलजारच्या छपाक या सिनेमाचं शूटिंग करणार आहे. हा सिनेमा अॅसिड हल्ला झालेल्या स्त्रीवर आहे. दीपिका मुख्य भूमिकेत आहे, म्हणून मेघना खूश आहे. तिनं दीपिकाला एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. तिनं लिहिलंय, दीपिका हा सिनेमा करेल, असं वाटत नव्हतं. पण तिनं होकार दिला, हेच मोठं आहे.

मेघनानं शेअर केली इमोशनल पोस्ट

मेघना गुलजारनं दीपिकाला एक इमोशल पोस्ट लिहिली. तिनं लिहिलंय, दीपिकानं जेव्हा सांगितलं की तिला भेटायचंय. तो क्षण माझ्यासाठी खास आहे. दीपिका भेटणं नशिबाची गोष्ट होती. तिला भेटण्याआधी माझ्या मनात अनेक शंका होत्या. कारण मी ज्या प्रकारचा सिनेमा घेऊन आले होते, तो तिला करायचाय की नाही? ती तशी तयार नव्हतीच. कारण लागोपाठ इमोशनल सिनेमे केल्यानंतर तिला आता हलकाफुलका सिनेमा करायचा होता. माझ्याकडे लाइट आणि रोमँटिक स्क्रिप्ट होती. माझ्या सिनेमाची कथा तर अशा स्त्रीची होती, जिनं आयुष्याचं आव्हान पेललं होतं. '

दीपिका या सिनेमासाठी फिट

मेघना म्हणते, 'दीपिका या व्यक्तिरेखेसाठी मला योग्य वाटली. पटकथा ऐकल्यानंतर दीपिकानं लगेचंच सिनेमा, व्यक्तिरेखा आणि मला स्वीकारलं. तिनं विनोदानं म्हटलं, सीनमध्ये लाल मिरची आणि मीठ लावून कैरी खायला मिळणार होती, म्हणून मी सिनेमात काम करायचं ठरवलं.'

दीपिका आणि रणवीरने गेल्या वर्षी इटलीमध्ये जवळच्या नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं. दीपवीरने एकत्र रामलीला, बाजीराव- मस्तानी आणि पद्मावत सिनेमात एकत्र काम केलं आहे.

तुम्ही बाॅबी देओलच्या पत्नीला पाहिलंय का? स्वत:च्या जोरावर बनली कोट्यवधींची मालकीण

First published: March 2, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या