VIDEO : बेबी ससेक्सची पहिली झलक, ब्रिटनचा नवा राजपुत्र दिसतो कसा

VIDEO : बेबी ससेक्सची पहिली झलक, ब्रिटनचा नवा राजपुत्र दिसतो कसा

मुलाच्या जन्मानंतर ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांनी आज पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

  • Share this:

मुंबई, 8 मे : ब्रिटनच्या शाही घराण्यात सोमवारी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्केलने 6 मे 2019 च्या सकाळी मुलाला जन्म दिला. त्यानंतर पहिल्यांदाच मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी ब्रिटनच्या नव्या राजपुत्राची पहिली झलक समोर आली. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या बेबी ससेक्सच्या पहिल्या लूकची प्रतीक्षा अखेर संपली.

डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्केल मुलाला जन्म दिल्यानंतर शाही कुटुंबानेही या बातमीला दुजोरा देत, 'आम्हाला हे सांगताना फार आनंद होत आहे की, 6 मे 2019 च्या सकाळी ड्यूक आणि डचेज ऑफ ससेक्स यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला आहे. आई आणि मुल दोघांची तब्येत चांगली आहे. हे शाही जोडपं या आनंदाच्या दिवशी त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभारही मानत आहेत.' अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार मेगनला 6 मेच्या सकाळपासूनच प्रसुती वेदना जाणवत होत्या. त्यामुळेच तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी तिच्यासोबत पती प्रिन्स हॅरीही होता. मेगन 18 मार्चपासून मॅटरनिटी लिव्हवर होती. त्यामुळे ब्रिटनसहित संपूर्ण जगाला मेगन आणि हॅरीच्या बाळाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली होती. सुरुवातीला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाळाचा जन्म होईल असं म्हटलं जात होतं पण अखेर मेगननं 6 मेच्या सकाळी राजघराण्याच्या नव्या राजपुत्राला जन्म दिला. गेल्या वर्षी 19 मे रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांचं लग्न झालं होतं.

...म्हणून पुन्हा एकदा शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'ची सोशल मीडियावर चर्चा

सलमानची 'ही' एक्स गर्लफ्रेंड करतेय विकी कौशलला डेट ? नेहा धुपियानं केला गौप्यस्फोट

‘मोदी तुम्ही तर पूर्णपणे मनातून उतरलात’, ट्वीटनंतर अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

First published: May 8, 2019, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading