मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'थोतांड तुमच्या ट्रेंडचं.. ' लावणी साम्राज्ञी मेघा घाडगेचा हा टोमणा नेमका कुणाला?

'थोतांड तुमच्या ट्रेंडचं.. ' लावणी साम्राज्ञी मेघा घाडगेचा हा टोमणा नेमका कुणाला?

लावणी साम्राज्ञी मेघा घाडगेचा हा टोमणा नेमका कुणाला?

लावणी साम्राज्ञी मेघा घाडगेचा हा टोमणा नेमका कुणाला?

गौतमी पाटील हिने लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य केले होते, अशी तिच्यावर टीका झाली होती. त्यावरून मेघा चांगलीच भडकली होती. तिने सातत्याने पोस्ट लिहून आणि आंदोलन करून याचा विरोध केला होता. त्यांची सध्याची पोस्ट देखील त्याच पद्धतीची आहे. त्यामुळे हा गौतमीला टोला आहे का.. असेही अनेकांचे म्हणणे आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च- आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीजनमध्ये मेघा घाडगेनं चांगलाच धुमाकूळ घातला. घरातून बाहेर आल्यानंतर देखील ती घरातील तिच्या काही मित्रमंडळींना भेटताना दिसते. सोशल मीडियावर तिच्या फ्रेंड सर्कलसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. मध्यंतरी गौतमी पाटील प्रकरणामुळे देखील मेघा चांगलीच चर्चेत आली होती.सोशल मीडियावर सतत सक्रीय असलेल्या मेघानं नुकतीच एक पोस्ट केली आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती लावणी नृत्य करत असून बैठकीची एक पोज दिली आहे.यामध्ये मेघा म्हणाली आहे की, “थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका,देखाव्याची इंग्रजी इथे आजमावू नका, ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही,ज्याला माहीत नाही लावणी त्याला मराठी म्हणू नका...'' अशा शब्दात मेघाने लावणीला हिणवणाऱ्या आणि लावणीचे विडंबन करणाऱ्या लोकांना सुनावलं आहे. तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

वाचा-'नाटकाच्या प्रयोगावेळी एक उंदीर स्टेजवर…' किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा

मधल्या काळात मेघा घाडगे गौतमी पाटील प्रकरणामुळं चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.गौतमी पाटील हिने लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य केले होते, अशी तिच्यावर टीका झाली होती. त्यावरून मेघा चांगलीच भडकली होती. तिने सातत्याने पोस्ट लिहून आणि आंदोलन करून याचा विरोध केला होता. त्यांची सध्याची पोस्ट देखील त्याच पद्धतीची आहे. त्यामुळे हा गौतमीला टोला आहे का.. असेही अनेकांचे म्हणणे आहे.  काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली. यापूर्वीही मेघा घाडगेने गौतमी पाटीलबद्दल लांबलचक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तिने गौतमी पाटीलवर संताप व्यक्त केला होता. बिग बॉसच्या घरात असताना तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले होते.

मेघाचे लावणीचे कार्यक्रम राज्यभर सुरू असतात. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या कार्यक्रमांना देखील प्रचंड गर्दी होत असते. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच लावणी, लावणी कलाकार यांच्याबद्दल बोलताना दिसते. अनेकादा लावणी कलाकारांच्या अडचणी याबद्दल देखील ती बोलताना दिसते.

गेल्या कित्येक महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना, लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर अनेकांनी संताप व्यक्त करत तिच्यावर टीका केली होती.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment