मुंबई, 10 डिसेंबर : अभिनेत्री आणि लोकप्रिय नृत्यांगणा मेघा घाडगे ही 'बिग बॉस मराठी 4' मुळे घराघरांत पोहचली. बिग बॉसमुळे तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून मेघा सतत चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच मेघाने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
मेघा घाडगेने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंसोबत तिने लक्षवेधी कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. फोटोंसोबत मेघाने लिहिलं, 'दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारी माणस ही माणुस्कीची लक्षण असतात. ती खरी माणसं. पण दुसऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या अपयशात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणस ही अघोरी आणि विकृत असतात. जे नाही स्वतःचं भल करतात नाही कोणाचं होऊ देतात. अशा बालिश आणि विकृत लोकांसाठी नेहमी असत राहा.' मेघाही ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मेघा पोस्टमध्ये पुढे म्हणते, मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय म्हणून मी मी आहे. मेघाच्या या पोस्टवर अनेक कमेंटचा पाऊस होताना दिसत आहे. दुसऱ्यांना नाही बदलू शकत आपण, खूप छान दिसताय ताई, एक नंबर, खूप छान, खूप गोंडस दिसतेय. किलर स्माईल, अशा अनेक कमेंट मेघाच्या या पोस्टवर येत आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते लाईक्सचाही वर्षाव करत आहेत.
दरम्यान, मेघा घाडगे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्टेड असते. याशिवाय मेघाचे लावणीचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. तीने नेहमीच तिच्या नृत्याने लोकांना प्रभावित केलं आहे. बिग बॉसच्या घरातही तिने लावणीची एक झलक सगळ्यांना दाखवली होती. तिचा तोही व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Marathi news