Big Boss 12 : कॅप्टन्सीसाठी मेघा धाडेला सहन करावा लागतोय अतोनात त्रास, VIDEO व्हायरल

Big Boss 12 : कॅप्टन्सीसाठी मेघा धाडेला सहन करावा लागतोय अतोनात त्रास, VIDEO व्हायरल

गेल्या आठवड्यात अभिनेत्री मेघा धाडेची बिग बाॅस 12मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली. त्यानंतर बिग बाॅसच्या घरात एकच गहजब उडालाय.

  • Share this:

मुंबई, 25 आॅक्टोबर : गेल्या आठवड्यात अभिनेत्री मेघा धाडेची बिग बाॅस 12मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली. त्यानंतर बिग बाॅसच्या घरात एकच गहजब उडालाय. मेघा धाडे, सोमी खान आणि दीपक ठाकूर यांनी पोल्ट्री फार्म टास्क पूर्ण करून कॅप्टन्सीवर दावा ठोकलाय. दीपक ठाकूर आणि उर्वशीमध्ये कॅप्टन्सीसाठी भांडणं सुरू आहेत.

आज रात्री टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये मेघाला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय, असं प्रोमोमध्ये दिसतंय. दीपक ठाकूर आणि घरातले इतर सदस्य मेघाला खूप त्रास देतायत. पण मेघाही टास्क जिंकण्यासाठी अजिबात मागे होत नाहीय. ती सगळ्यालाच तोंड देते.

बिग बाॅसच्या घरात जायला मिळतेय याबद्दल मेघा एकदम खूश होती. न्यूज18लोकमतशी बोलताना ती म्हणाली, ' मला मराठी बिग बाॅसमध्ये प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळालाय. त्यामुळे आता याही बिग बाॅसमध्ये मिळेल.' मेघाला विश्वास आहे.

मध्यंतरी मेघाच्या घराचं शिफ्टिंग सुरू होतं. त्यामुळे तिला 'बिग बाॅस 12'चे फार एपिसोड्स पाहता आले नाहीयत. पण बिग बाॅसच्या घरात तिला बराच काळ राहायचंय.

मेघा म्हणाली, ' मी बिग बाॅसच्या घरात खऱ्याची बाजू घेईन. मी उगाच कुणाला खूश करण्यासाठी खोटं वागणार नाही.'

सर्व स्पर्धकांवर मात करत अभिनेत्री मेघा धाडेने बाजी मारत कलर्सच्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा किताब पटकावला. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला धडाक्यात सुरूवात झाल्यानंतर सर्वांनाच प्रचंड उत्सुकता होती. चुरशीच्या या लढतीत मेघाने बाजी मारली.

सनी लिओनीच्या बोल्ड लुकचं रहस्य आहे या माणसाच्या हाती!

First published: October 25, 2018, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading