सनी लिओनची 'ड्युप्लिकेट' पाहिली का?

सनी लिओनची 'ड्युप्लिकेट' पाहिली का?

टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून सनीची कार्बन कॉपी समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 मार्च : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनला आत्तापर्यंत सर्वांनी स्वीकारलं आहे. सुरुवातीला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला मात्र आता तिनं इथं आपला जम बसवला आहे. सोशल मीडियावरही तिचे असंख्य चाहते आहेत. अनेकदा ती ज्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी जाते तिथं तिच्या चाहत्याची प्रचंड गर्दी दिसून येते. पण सध्या व्हायरल होत असलेल्या टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून सनीची कार्बन कॉपी समोर आली आहे. ही मुलगी हुबेहूब सनी लिओनसारखी दिसत असल्यानं आता सोशल मीडियावर तिची खूप चर्चा आहे.

सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली ही मुलगी या टिकटॉकवर पूजा लिओन नावानं प्रसिद्ध आहे.या अॅपवरील वेगवेगळ्या डायलॉग आणि गाण्याच्या व्हिडिओमध्ये पूजाचे हावभाव पूर्णपणे सनीशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे लोक आता तिला सनीची जुळी बहीण म्हणून ओळखू लागले आहेत. मात्र प्रत्यक्षात पूजा ही सनीची सख्खी बहीण नसली तरी सनीप्रमाणेच पूजाच्याही चाहत्यांमध्ये दिवसांगणिक वाढ होत आहे.

युट्युबवर 'ड्युप्लिकेट सनी लिओन' म्हणून ओळखली जात असल्यामुळेच कदाचित पूजानं आपल्या नावापुढे लिओन हे आडनाव लावलं असावं. पूजाचं खरं नाव पूजा मिश्रा असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

 वाचा : Spotted: मुंबईमध्ये जिमच्या बाहेर दिसली हॉट अभिनेत्री सनी लिओन

First published: March 8, 2019, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading