मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘राधे’मधील खलनायक खऱ्या आयुष्यात आहे हिरो; आर्मीमधील सैनिक कसा झाला चित्रपटातील विलन?

‘राधे’मधील खलनायक खऱ्या आयुष्यात आहे हिरो; आर्मीमधील सैनिक कसा झाला चित्रपटातील विलन?

‘भाईजानसाठी काहीही…’; खऱ्या आयुष्यात आर्मीमध्ये सैनिक म्हणून काम केलेला सांगे सलमान खानसाठी झाला खलनायक

‘भाईजानसाठी काहीही…’; खऱ्या आयुष्यात आर्मीमध्ये सैनिक म्हणून काम केलेला सांगे सलमान खानसाठी झाला खलनायक

‘भाईजानसाठी काहीही…’; खऱ्या आयुष्यात आर्मीमध्ये सैनिक म्हणून काम केलेला सांगे सलमान खानसाठी झाला खलनायक

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 16 मे: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट राधे अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. सलमानचे चाहते चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करतायेत तर टीकाकार सलमानला ट्रोल करण्यात व्यस्त आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात रणदीप हुड्डा, गौतम गुलाटी आणि सांगे शेलट्रम असे एकून तीन खलनायक दाखवण्यात आले आहेत. मात्र या तिघांमध्ये अभिनेता सांगेनं (Sangay Tsheltrim) सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल चित्रपटात खलनायकाच्या रुपात झळकणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र सुपरहिरो आहे. तो आर्मीमधील एक सैनिक होता. तर मग पाहूया सैनिक होऊन देशाची सेवा करणारा आर्मी मॅन कसा झाला सलमानच्या चित्रपटाचा खलनायक...

सांगे शेलट्रम हे भूतानमधील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. तो भूतानच्या सैन्यात कमांडो म्हणून कार्यरत होता. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यानं आपलं लक्ष बॉडी बिल्डिंगकडे वळवलं. अन् याच दरम्यान त्याला काही मॉडलिंगच्या ऑफरही मिळाल्या. सुपरबॉडी असलेल्या या सांगेची मॉडलिंग क्षेत्रात चर्चा होऊ लागली. अन् एके दिवशी सलमान खानची नजर त्याच्यावर पडली. पाहताच क्षणी त्यानं आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर त्याला दिली.

जन्नत फेम सोनल चौहान का झाली बॉलिवूडमधून गायब? काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई

सांगेनं मिड डेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं सलमानसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख केला. तो म्हणाला, “मी ओ ओ जाने जाना या गाण्यात सर्वप्रथम सलमान खानला पाहिलं होतं. त्याची बॉडी आणि व्यक्तिमत्व पाहून मी खूपच प्रभावित झालो. तेव्हापासून सलमानला भेटण्याची इच्छा होती. ही इच्छा राधे चित्रपटानं पूर्ण केली. एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या निमित्तानं माझी सलमानसोबत भेट झाली होती. त्यावेळी सलमाननं मला त्याच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर मी राधेमध्ये झळकलो. येत्या काळात मला बॉलिवूड चित्रपटांमध्ये आर्मी ऑफिसरची भूमिका साकारण्याची इच्छा आहे.”

विकी कौशलला होता वडिलांचा विरोध; पाहा एक इंजिनियर कसा झाला अभिनेता?

13 मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात तो zee5 च्या झी प्लेक्स (zee plex) वर प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी अनेकांनी एकाच वेळी zee5 लॉगीन केल्याने  zee5 चा सर्वर क्रॅश झाल्याचं पाहायाला मिळालं. त्यामुळे प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिल्याचं समजतं आहे. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातंही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या (UAE) फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार राधेने पहिल्याच दिवशी ओव्हरसिजमध्ये 2.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताबाहेर राधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम मानला जात आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Salman khan