भेटा कतरिना कैफच्या बॉडीगार्डला, सलमान खानही त्याच्यासमोर फिका!

भेटा कतरिना कैफच्या बॉडीगार्डला, सलमान खानही त्याच्यासमोर फिका!

जेव्हा तो कॅटरिना कैफबरोबर बाहेर पडतो तेव्हा त्याचा स्वग पाहण्यासारखा असतो.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : आजकाल बॉलिवूड स्टार्सविषयीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकदा यामुळे या स्टार्संना गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की सुद्धा होते. पण हे टाळण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी बॉडीगार्डची नेमणूक केली आहे. बॉडीगार्ड म्हटलं की सर्वांच्याच डोळ्यासमोर येतो तो सलमानचा बॉडीगार्ड शेरा. शेरा सलमान सोबत सर्व ठिकाणी असल्यानं त्याला ओळखत नाही असं कोणीच सापडणार नाही. पण बॉलिवूडच्या काही अभिनेत्रीचे बॉडीगार्ड जे एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी नाहीत. कतरिनाचा बॉडीगार्ड त्यापैकीच एक आहे. तो फक्त कतरिनाचाच नाही तर याआधी इतर अनेक सेलिब्रेटींचा अंगरक्षक राहिला आहे.

कतरिना कैफच्या बॉडीगार्डचे नाव दीपक सिंह असून त्याच्या समोर सलमानही फिका पडेल अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. दीपक सिंह चा स्वॅग स्टाईल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जिममध्ये कमावलेली बॉडी आणि अंगात सुट आणि डोळ्यावर काळा गॉगल लावून जेव्हा तो कॅटरिना कैफबरोबर बाहेर पडतो तेव्हा त्याचा स्वग पाहण्यासारखा असतो.

VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

सिनेमांच्या आल्या होत्या ऑफर

दीपक सिंहला बर्‍याच चित्रपटांच्या ऑफरही आल्या आहेत. पण या ऑफर त्याने स्वीकारल्या नाहीत. दीपकचे वडील सैन्यत अधिकारी होते. दीपकला कधीही बॉडीगार्डची नोकरी करायची नव्हती. त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते. दीपकची स्वतःची सुरक्षा एजन्सीही आहे. पण असं असतानाही तो स्वत: सिने कलाकारांना सेक्युरिटी देण्याचं काम करतो.

बॉलिवूड सेलिब्रेटींना पुरवतो सुरक्षा

दिपक सिंह फक्त कतरिनाचाच अंगरक्षक नाही तर शाहरुख खान, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणबीर कपूर आणि राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर अशा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड म्हणून त्याने काम केले आहे. दीपकनं काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला चित्रपट निर्माते, अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शकांनी अभिनय क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं त्यांच्या ऑफर कधीच स्वीकारल्या नाहीत.

दीपिका-रणवीरनं साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पाहा PHOTO

स्वतःची सुरक्षा एजन्सी

दीपक विवाहित असून त्याला एक गोड मुलगी आहे. दीपक बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तो नेहमी कोणत्याही एका सेलिब्रिटी बरोबर नसतो नेहमीच वेगवेगळ्या स्टार्सना सुरक्षा देतो. दीपक हा उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातला असून तो अभिनेता रोनित रॉयचा नातेवाईक आहे. दीपकची स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे ज्याचे नाव 'डोम सिक्युरिटी सर्व्हिसेस' आहे. दीपकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास माहिती मिळेल की दीपकने दिशा पाटनी, जॅकलिन, वरुण धवन आणि सलमान खानसोबतही काम केले आहे. दीपकची फोटो पाहिल्यावर त्याला कोणाही अभिनेताच म्हणेल.

थरकाप उडवणारा Mardaani 2 Trailer पाहिल्यावर चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका!

================================================================

इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE

Published by: Megha Jethe
First published: November 14, 2019, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading