Home /News /entertainment /

शाहीद कपूरच्या मीरानं झोकात मिरवला बोल्ड ब्लॅक लुक, शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो

शाहीद कपूरच्या मीरानं झोकात मिरवला बोल्ड ब्लॅक लुक, शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो

शाहीद कपूरची बायको मीरा राजपूत ही कायमच तिच्या हटके फॅशन सेन्समुळं चर्चेत असते. आता तिनं गोव्यात केलेला पार्टी लुकही लक्षवेधी ठरला आहे.

  मुंबई, 19 जानेवारी : मीरा राजपूत (Mira Rajput) आणि शाहीद कपूर (Shahid Kapoor) हे बॉलिवूडमधलं सेलिब्रिटी कपल. मीरा राजपूत आपल्या आगळ्या फॅशन सेन्ससाठीही (fashion sense) ओळखली जाते. आता नुकताच तिनं सुरेखपणे मिरवलेला एक लूक चाहत्यांना खूपच आवडला. हा लूक तिनं केला होता पती शाहीदसोबत गोव्यामध्ये (Goa) सुट्ट्यांचा आनंद घेताना. सध्या दोघं गोव्यात एकमेकांना वेळ देत आहेत. मीरानं नाईट आउट पार्टीदरम्यानचे (night out party) काही फोटोज चाहत्यांसाठी (fans) शेअर केले. यातला तिचा लूक नजर खिळवून ठेवणारा होता.
  या लूकची खासियत होतं, मीरानं घातलेलं काळ्या रंगाचं ब्रालेट (black bralette). हा तिच्या आजवरच्या स्टाइल्समधला सर्वात बोल्ड लूक होता. समर समव्हेअर या फॅशन लेबलनं हा ब्रालेट डिझाईन केला होता. यात समोर नॉट अर्थात गाठ घातलेला पॅटर्न होता. यातून या टाय-फ्रंट प्रकारच्या टॉपला (top) प्लीटेड लूक मिळाला. टॉपच्या मागील बाजूला डीपकट डिझाईन होतं. यात लिनन आणि लायोसेल अशा मिक्स धाग्यांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला गेला. या अनोख्या ग्लॅमरस टॉपची किंमत आहे 4790 रुपये. आणि सोबतची फ्लेयर्ड पँट 4490 रुपयांना आहे. हा लूक खरंतर असा होता, की यात इतर कशाची जोड देण्याची गरजच नव्हती. मात्र यात एक स्टाईल एलिमेंटची भर घालण्यासाठी मीरानं AllSaints चा ओव्हरले वरून घातला होता. या लुकसोबत त्याचा मेळ एकदमच मस्त जमून आला होता. सोबत तिनं अगदी मोजका मेकअप करत न्यूड लिप्स आणि मोकळे केस ठेवले आहेत. सोबत तिच्या हातात जी बॅग दिसते आहे तिची किंमत तब्बल 22,400 रुपये आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Goa, Shahid Kapoor-Mira Rajput

  पुढील बातम्या