VIDEO : अभिनेत्रीला जेवणात सापडले जिवंत किडे, 5 स्टार हॉटेलची पोलखोल

VIDEO : अभिनेत्रीला जेवणात सापडले जिवंत किडे, 5 स्टार हॉटेलची पोलखोल

या अभिनेत्रीला हॉटेलमधील जेवणात जिवंत किडे सापडले आहेत. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : पंचतारिका हॉटेल्समधील थाट आणि महागड्या खाण्याविषयी सर्वांनाच माहित आहे. मात्र या सर्वात या हॉटेल्सची काळी बाजू नेहमीच झाकली जाते. काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस सोबत घटलेला किस्सा सर्वांनाच माहीती आहेच. अवघ्या 2 केळ्यांसाठी त्याला 442 रुपये मोजावे लागले होते. त्यानंतर आता या 5 स्टार हॉटेलबाबत आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका अभिनेत्रीला हॉटेलमधील जेवणात वळवळणारे किडे सापडले आहेत. या अभिनेत्रीचं नाव मीरा चोप्रा असून तिनं याचा व्हिडीओ तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

हिंदी आणि साउथमधील अभिनेत्री मीरा चोप्रा अहमदाबाद येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये थांबली आहे. या ठिकाणी तिनं सकाळचा नाश्ता ऑर्डर केला. मात्र त्यात तिला वळवळणारा किडे दिसले. जेवणाच्या प्लेटमध्ये किडे पाहिल्यावर या अभिनेत्रीनं त्याचा व्हिडीओ बनवून तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. ज्यात त्या प्लेटमधील किडे आणि अन्न पदार्थ दिसत आहेत. जसं अन्न कोणालाच आपल्या प्लेटमध्ये यावं अशा इच्छा नसेल.

खतरों के खिलाडीमधील अमृता खानविलकरचे हॉट स्पोर्ट्स लुक VIRAL, पाहा फोटो

या अभिनेत्रीनं अशा लक्झरी हॉटेल्सची पोल खोल करण्याची सर्वांना विनंती केली आहे. किड्यांचा हा व्हिडिओ शेअर करताना मीरानं लिहिलं, मी सध्या अबमदाबादच्या डबल ट्री हेल्टन हॉटेलमध्ये थांबले आहे. मी सकाळी नाश्ता मागवला आणि त्यासोबत मला जिवंत किडे मिळाले. आपण अशा ठिकणी राहण्यासाठी एवढे पैसे देतो. मात्र त्यात हे लोक खाण्याच्या पदार्थांमध्ये किडे सुद्धा देतात. मला वाटतं की, यावर लवकरात लवकरत कारवाई करण्यात यावी. कृपया ट्रेंड करा ज्यामुळे हे सर्वांना समजेल.

VIDEO फॅशन शो दरम्यान पाय अडखळून रँपवरच पडली असती ही प्रेग्नंट अभिनेत्री...

कोण आहे मीरा चोप्रा

अभिनेत्री मीरा चोप्रानं 2005 मध्ये तमिळ सिनेमा Anbe Aaruyire मधून डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं 2014 मध्ये तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचं नाव होतं ‘गँग ऑफ घोस्ट’. त्यानंतर मीरानं '1920 लंडन' आणि करण जौहरच्या 'कलंक' सिनेमात काम केलं. लवकरच ती ‘सेक्शन 375’ मध्ये दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत अक्षय खन्ना आणि रिचा चढ्ढा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Chhichhore Trailer 2 : हॉस्टेलमधील मस्ती आणि दोस्तीची दमदार केमिस्ट्री

======================================================================

SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 11:59 AM IST

ताज्या बातम्या