मुंबई 10 मे: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं सध्या देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमालीचा वाढला आहे. परिणामी औषधं, रुग्णालयातील सुविधा, लसी यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहेत. देशभरातील अनेक रुग्णांना अपेक्षित उपचार देखील मिळत नहियेत. अन् असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री मीरा चोप्राच्या (Meera Chopra) बाबतीत घडला. योग्य उपचार न मिळाल्यामुळं तिच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अन् यासाठी तिनं सरकारला जबाबदार धरलं आहे.
“ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. आपलं सरकार नेमकं करतंय तरी काय. माझ्या कुटुंबीयांचा मृत्यू हा कोरोनामुळं नाही तर अपयशी ठरलेल्या आपल्या आरोग्य व्यवस्थेमुळं झाला आहे. आपला एकमेव देश आहे जिथं लोक ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं मरत आहेत. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. कधी कोणासोबत काय घडेल हे आता सांगता येणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन मीरानं आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी तिच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे? ‘सई ताम्हणकरचं घर’
This is heartbreaking. Something ive been saying it, these are not covid deaths, these are murders by our failed infrastructure. The only country where people are dying bcoz there is no oxygen. Appalling!!!!#COVID19India #RahulVohra https://t.co/RZwuoS9xZ0
— meera chopra (@MeerraChopra) May 9, 2021
मीरा राजपूत ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं काही वर्षांपुर्वी बॉलिवूडमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु ती त्यामध्ये ती अपयशी ठरली परिणामी तिनं आपलं लक्ष दाक्षिणात्य सिनेमांच्या दिशेनं वळवलं. चित्रपटांसोबतच ती देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. परिणामी सध्या तिचं हे ट्विट व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.