मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Meena Kumari Death Anniversary: मीना कुमारींना कुणी दिलेल्या 31कानाखाली? 'ट्रॅजेडी क्वीन' का लपवायची आपला डावा हात?

Meena Kumari Death Anniversary: मीना कुमारींना कुणी दिलेल्या 31कानाखाली? 'ट्रॅजेडी क्वीन' का लपवायची आपला डावा हात?

मीना कुमारी का लपवायच्या आपला डावा हात?

मीना कुमारी का लपवायच्या आपला डावा हात?

Meena Kumari Death Anniversary: बॉलिवूडची 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून अभिनेत्री मीना कुमारी यांना ओळखलं जातं. मीना कुमारींनी अवघ्या 38 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. इतक्या कमी वयातही मीना कुमारींनी बॉलिवूडमध्ये आपलं मोठं स्थान निर्माण केलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 31 मार्च- बॉलिवूडची 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून अभिनेत्री मीना कुमारी यांना ओळखलं जातं. मीना कुमारींनी अवघ्या 38 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. इतक्या कमी वयातही मीना कुमारींनी बॉलिवूडमध्ये आपलं मोठं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेत्रीचं व्यावसायिक आयुष्य भलेही ग्लॅमरस असलं तरी खाजगी आयुष्य मात्र फारच रहस्यमयी होतं. आज अभिनेत्रीचा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने मीना कुमारी यांच्या आयुष्यातील काही माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

मीना कुमारी यांच्याबाबत अनेक किस्से वाचायला आणि ऐकायला मिळत असतात. त्यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा म्हणजे त्यांना एका चित्रपटाच्या सेटवर एक-दोन नव्हे तब्बल 31 कानाखाली देण्यात आले होते. याचं कारणही फारच विचित्र होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे जे लोक मीना कुमारींचे चाहते आहेत किंवा त्यांचे चित्रपट पाहिले आहेत. त्यांना ही गोष्ट नक्की माहिती असेल की, मीना कुमारी नेहमीच आपला डावा हात साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने लपवायचा प्रयत्न करत होत्या. यामागेसुद्धा एक महत्वाचं कारण होतं.

मीना कुमारी त्याकाळात आघडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांच्याकडे अनेक दिग्दर्शक आपले सिनेमे घेऊन रांगा लावत असत. एकदा त्या एका मोठ्या दिग्दर्शकासोबत एक चित्रपट करत होत्या. चित्रपटाचं शूटिंगही सुरु झालं होतं. एकदा सेटवर चित्रपटाच्या निर्मात्याने सर्वांनी एकत्र बसून जेवायचं अशी इच्छा व्यक्त केली. आणि त्यानुसार मीना कुमारींच्या मेकअप रुममध्ये एक मोठा टेबल ठेवून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

(हे वाचा:अमरीश पुरींनी आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये यायला केलेली मनाई; कोण आहे त्यांचा लेक आणि काय करतो? )

सर्वांचं जेवण सुरु असताना मीना कुमारींजवळ बसलेल्या दिग्दर्शकाने त्यांच्यासोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली. त्याने त्यांच्या पायावर पाय ठेवून स्पर्श करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर मीना कुमारींचा हात ओढून घेऊन त्याने हातावर किस करायला सुरुवात केली. त्यांचं हे वागणं अभिनेत्रीला अजिबात रुचलं नाही. या प्रकाराने त्या चिडून लालबुंद झाल्या. आणि त्यांनी त्या दिग्दर्शकाला जोरदार कानाखाली दिली. आणि सर्वांसमोर ही एका सीनची रिहर्सल असल्याचं दाखवलं.

या प्रकाराने दिग्दर्शक प्रचंड संतापला आणि त्याने मीना कुमारींशी बदला घेण्याचं ठरवलं. आणि स्क्रिप्टमध्ये बदल करत मीना कुमारींना कानाखाली पडते असा सीन ऍड केला. आणि मुद्दाम कारण काढत या सीनच ३१ रिटेक घेतले. जेणेकरुन मीना यांना अभिनेत्याकडून जास्तीत जास्त कानाखाली पडतील.

मीना कुमारी एकदा महाबळेश्वरहुन मुंबईला येत असताना, त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामध्येच त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीचा आकारच बदलला होता. पडद्यावर ते व्यवस्थित दिसणार नाही या विचाराने त्या आपला डावा हात लपवण्याचा प्रयत्न करत होत्या.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment