मुंबई, 31 मार्च : वयाच्या केवळ 39व्या वर्षीच मीना कुमारीनं जगाचा निरोप घेतला. 1972मध्ये आलेल्या 'पाकिजा' सिनेमानं मीना कुमारीला नवी ओळख मिळाली. पण ती नवी ओळख ती फार टिकवू शकली नाही. नशीबानं ठरवलेलं कोणीही बदलू शकत नाही. मीना कुमारीच्या बाबतीतही असंच घडलं. फार कमी वयात मीना कुमारी लीव्हरच्या आजारानं हे जग सोडून गेली. प्रेमभंग झाल्यानं तिनं दारूशी देखील मैत्री केली होती. मीना कुमारीचं आयुष्य लहानपणापासूनच अनेक संकटांनी भरलेलं होतं. पण वैयक्तिक आयुष्यातील वादळं तिनं कधीच कामाच्या ठिकाणी येऊ दिली नाहीत.
मीना कुमारीनं प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही बरोबर लग्न केलं होतं. कमाल अमरोही यांनी मीना कुमारीबरोबर पाकिजा हा सिनेमा केला. 1-2 नाही तर तब्बल 16 वर्ष दोघे या सिनेमावर काम करत होते. सिनेमा रिलीज होताच सुपरहिट ठरला. पण हे यश पाहण्यासाठी मीना कुमारी काही या जगात नव्हती. याच सिनेमावेळी मीना कुमारीबरोबर वाईट घटना घडता घडता राहिली. या घटनेचा खुलासा वरिष्ठ पत्रकार विनोद मेहता यांनी केला होता.
हेही वाचा - प्रसिद्ध दिग्दर्शकानं छापली होती मनीषा कोईरालाच्या मृत्यूची बातमी; 'हे' होत कारण
पाकिजा सिनेमाच्या आऊटडोर शुटींगवेळी एक विचित्र घटना घडली होती. पत्रकार विनोद मेहता यांनी सांगितलं, कमाल अमरोही आणि त्यांची टीम मध्यप्रदेशातील शिवपुरी येथून जात होते. तेव्हा त्यांच्या गाडीचं पेट्रोल अर्ध्या रस्त्यात संपलं. ते ज्या ठिकाणी थांबले होते तो परिसर दरोडेखोरांचा परिसर होता. एक अज्ञात गाडी आपल्या परिसरात आली म्हटल्यावर त्यांनी लुटण्याच्या हिशोबानं आपली टोळी सक्रीय केली.
मध्यप्रदेशमधील कुख्यात गुंड अमृता लाल आणि त्याच्या टोळीनं कमाल अमरोही यांच्या गाडीला हेरलं. कमाल अमरोही आणि टीमची चांगलीच लुटमार करण्याच्या हेतून आलेल्या गुंडाच्या टोळीला जेव्हा कळलं की अभिनेत्री मीना कुमारी गाडीत बसली आहे तेव्हा ते लुटमार करायला आलो हेच विसरले. त्यांनी मीना कुमारीची चौकशी केली. त्यांची माफी मागितली. इतकंच नाही मीना कुमारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या जेवणाची देखील सोय केली.
विनोद मेहता यांनी पुढे सांगितलं की, गुंड अमृत लाल यानं मीना कुमारीच्या हातून ऑटोग्राफ काढून घेतली. त्यानं मीना कुमारीच्या हातात चाकू दिला आणि यानं माझ्यावर हातावर तुमचं नाव लिहा असं सांगितलं. हे पाहून मीना कुमार हैराण झाली. घाबरत घाबरत तिनं मोठ्या मुश्किलीनं अमृत लालच्या हातावर चाकून ऑटोग्राफ दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News