मीना कुमारी यांना खरंच तिहेरी तलाक देण्यात आला होता का?

मीना कुमारी यांचे पती कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारींना तीन वेळा तलाक म्हटलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 08:52 AM IST

मीना कुमारी यांना खरंच तिहेरी तलाक देण्यात आला होता का?

मुंबई, 1 ऑगस्ट : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1933 मध्ये मुंबईतील दादर येथे झाला होता. मात्र खूप कमी वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य मात्र वादग्रस्त राहिलं. मीना कुमारीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिहेरी तलाकचं दु:ख सहन केलं होतं असं म्हटलं जातं. मीना कुमारी यांचे पती कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारींना तीन वेळा तलाक म्हटलं आणि मग पश्तात्ताप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही उरलं नाही.

मीना कुमारीचं लग्न 'पाकिजा'चे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर झाले होते. एक दिवस दोघांमध्ये काही वाद झाला. अमरोहींनी रागानं तीन वेळा तलाक शब्द उच्चारला. त्यावेळच्या इस्लामिक कायद्याप्रमाणे दोघांचं लग्न तुटलं.

परिणिती चोप्राला बॉयफ्रेंडनं दिला धोका, भावुक होत मुलाखतीत उलगडलं सत्य

कमाल अमरोही यांना मात्र मीना कुमारीला गमवायचं नव्हतं. पण धर्मगुरूंनी सांगितलं की आता तुम्हाला मीनाकुमारींशी लग्न करता येणार नाही आणि जर करायचचं असेल तर त्यासाठी मीना कुमारीला ‘हलाला’ करावं लागेल. हलाला म्हणजे घटस्फोटित महिलेनं दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं. सुहागरात साजरी करायची. मगच ती आपल्या पहिल्या पतीसोबत पुन्हा लग्न करू शकते.

Loading...

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्न

कमाल अमरोहींनी मीना कुमारीचं लग्न आपला जवळचा मित्र अमान उल्लाह खान यांच्याशी केलं. अमान उल्लाह खान हे झीनत अमानचे वडील. हलालाची प्रथा पाळल्यानंतर मीना कुमारीनं पुन्हा कमाल अमरोहींशी लग्न केलं.

पण या सर्व गोष्टींचा परिणाम मीना कुमारींच्या तब्येतीवर झाला. त्या पूर्ण उन्मळून गेल्या. त्यांनी म्हटलं, ' धर्माच्या नावाखाली आपलं शरीर दुसऱ्या पुरुषाच्या हातात द्यावं लागतं तेव्हा आपण आणि वेश्येत फरक तो काय?' मात्र मीनाकुमारी तिहेरी तलाकाच्या शिकार झाल्या होत्या याबाबत कोणताही ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही.

जेव्हा मोहम्मद रफींच्या एका गाण्यानं मुंबईतील एका मुलाचं अ‍ॅडमिशन होतं...

त्यानंतर मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. त्यांची तब्येत बिघडतच चालली. आणि वयाच्या 39व्या वर्षी म्हणजेच 31 मार्च 1972 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.

======================================================================

दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...