अभिनय शिकवून मीना कुमारींनी सावरलं होतं धर्मेंद्र यांचं करिअर

अभिनय शिकवून मीना कुमारींनी सावरलं होतं धर्मेंद्र यांचं करिअर

1966 मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर'मध्ये धर्मेंद्र यांची शिफरसही मीना कुमारींनीच केली होती. त्यामुळे धर्मेंद्र सिनेसृष्टीत यशस्वी होण्याचं श्रेय पूर्णपणे मीना कुमारींना जातं.

  • Share this:

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1933 रोजी मुंबईतील दादरमध्ये झाला. त्यांचं खरं नाव महजबी बनो असं होतं. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईवडीलांकडे डॉक्टरांना देण्याएवढेही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मीना कुमारींना अनाथ आश्रमात सोडलं. मात्र त्यांच्या वडीलांच्या हळव्या मनाला ते पटलं नाही आणि ते आपल्या मुलीला परत घरी घेऊन आले.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1933 रोजी मुंबईतील दादरमध्ये झाला. त्यांचं खरं नाव महजबी बनो असं होतं. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आई वडीलांकडे डॉक्टरांना देण्याएवढेही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मीना कुमारींना अनाथ आश्रमात सोडलं. मात्र त्यांच्या वडीलांच्या हळव्या मनाला ते पटलं नाही आणि ते आपल्या मुलीला परत घरी घेऊन आले.

अगदी लहान वयातच घरची सर्व जबाबदारी मीना कुमारींच्या खांद्यावर आली आणि त्यांनी वयाच्या 7 व्या वर्षापासूनच सिनेमात काम करायला सुरूवात केली. 'फरजद-ए-हिंद' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र त्यांना अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली ती 1952मध्ये आलेल्या 'बैजू बावरा' या सिनेमानं.

'बैजू बावरा' नंतर मीना कुमारी एकामगोमाग एक सलग यशाच्या पायऱ्या चढत गेल्या. मीना कुमारींना 'बैजू बावरा'साठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या बॉलिवूडमधल्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.

1951मध्ये तमाशा सिनेमाच्या सेटवर मीना कुमारी आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी या दोघांनी लग्नही केलं मात्र त्यांचं हे नात फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर कमाल यांनी मीना कुमारींवर संशय घ्यायला सुरूवात केली तसंच त्यांच्यावर सिनेमात काम करण्याविषयी बंधन लादायलाही सुरूवात केली. यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत असतं आणि अखेर त्यांनी 1964 मध्ये घटस्फोट घेतला.

कमाल अमरोही यांच्यापासून वेगळे झाल्यावर मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्यातील जवळीक वाढू लागली. धर्मेंद्र त्यावेळी विवाहित आणि स्ट्रगलिंग अभिनेता होते तर मीना कुमारी बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. मीना कुमारींना धर्मेंद्र यांना अभिनयातील कसब शिकवलं. तसंच 1966 मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर'मध्ये धर्मेंद्र यांची शिफरसही मीना कुमारींनीच केली होती. त्यामुळे धर्मेंद्र सिनेसृष्टीत यशस्वी होण्याचं श्रेय पूर्णपणे मीना कुमारींना जातं.

कमाल अमरोही यांच्यापासून वेगळे झाल्यावर मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. धर्मेंद्र त्यावेळी विवाहित आणि स्ट्रगलिंग अभिनेता होते तर मीना कुमारी बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. मीना कुमारींना धर्मेंद्र यांना अभिनयातील कसब शिकवलं. तसंच 1966 मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर'मध्ये धर्मेंद्र यांची शिफरसही मीना कुमारींनीच केली होती. त्यामुळे धर्मेंद्र सिनेसृष्टीत यशस्वी होण्याचं श्रेय पूर्णपणे मीना कुमारींना जातं. मात्र दोन तीन वर्षांनी या दोघांनीही आपापले रस्ते बदलले.

मीना कुमारींचा शेवटचा सिनेमा पाकिजाच्या शूटिंग दरम्यान त्यांना आजारपणानं घेरलं तरीही त्या सलग सिनेमाचं शूटिंग करत राहिल्या. पुढे आजारपण एवढं वाढलं की झोप येण्यासाठी डॉक्टरांनी मीना कुमारींना झोपण्या अगोदर एक पेग ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला मात्र हा सल्लाच मीना कुमारींच्या मृत्यूचं कारण बनला. यामुळे मीना कुमारी नशेच्या आहारी गेल्या आणि शेवटी लिव्हर खराब होऊन 31 मार्च 1972मध्ये मीना कुमारींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मीना कुमारींचा शेवटचा सिनेमा पाकिजाच्या शूटिंग दरम्यान त्यांना आजारपणानं घेरलं तरीही त्या सलग सिनेमाचं शूटिंग करत राहिल्या. पुढे आजारपण एवढं वाढलं की झोप येण्यासाठी डॉक्टरांनी मीना कुमारींना झोपण्या अगोदर एक पेग ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला मात्र हा सल्लाच मीना कुमारींच्या मृत्यूचं कारण बनला. यामुळे मीना कुमारी नशेच्या आहारी गेल्या आणि शेवटी लिव्हर खराब होऊन 31 मार्च 1972मध्ये मीना कुमारींचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या