Home /News /entertainment /

VIDEO: 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका आता हिंदीत, तुम्ही पाहिला का नवा प्रोमो?

VIDEO: 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका आता हिंदीत, तुम्ही पाहिला का नवा प्रोमो?

मराठीमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक भाषांमधील मालिकांचे मराठी सिक्वल्स बनत (Marathi Serial) आहेत. आणि प्रेक्षकांना ते पसंत देखील पडत आहेत. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली आहे, या माहितीनुसार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayako) आता हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 1 एप्रिल-   मराठीमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक भाषांमधील मालिकांचे मराठी सिक्वल्स बनत  (Marathi Serial) आहेत. आणि प्रेक्षकांना ते पसंत देखील पडत आहेत. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली आहे, या माहितीनुसार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'   (Mazya Navryachi Bayako)  आता हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे. ही मालिका आता हिंदीमध्ये डब करून हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. झी मराठीवर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सुरु करण्यात आली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स यामुळे प्रेक्षक अक्षरशः खिळून होते. 23 ऑगस्ट 2016 मध्ये ही मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली होती. मालिकेतील कलाकरांनासुद्धा मोठी प्रसिद्धी मिळाली होती. हे कलाकार आज मालिका बंद होऊनसुद्धा सतत चर्चेत असतात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अभिनेत्री अनिता दातेनं राधिका ही मुख्य भूमिका साकारली होती. तर तिच्या नवऱ्याची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकरने साकारली होती. तर त्याची गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री रसिक सुनील आणि नंतर इशा केसरकरने साकारली होती. शिवाय अरुण नलवडे,मिहीर राजदा, अदिती द्रविड, श्वेता मेहेंदळे, यश प्रधान, सचिन देशपांडे,रुचिरा जाधव यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  गेल्यावर्षी ही मालिका बंद झाली होती. चाहते ही मालिका आणि यातील कलाकरांना सतत सोशल मीडियावर मिस करताना दिसून येतात. त्यांनतर आता ही मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे. परंतु यावेळी ही मालिका हिंदीमध्ये बघता येणार आहे. झी अनमोल या वाहिनीवर ही मालिका 'मेरे साजन कि सहेली' या नावाने पाहायला मिळणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या