• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Mazi Tuzi Reshimgathi मधील 'पिचकू'ला ओळखलंत का? अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

Mazi Tuzi Reshimgathi मधील 'पिचकू'ला ओळखलंत का? अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

Mazi Tuzi Reshimgathi मधील वेद आंब्रे (Ved Ambre) याने कमी वयात अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्याच्या पिचकू या भूमिकेचं कौतुक होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgathi ) ही मालिका कमी काळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या दिग्गज कलाकारांमुळे ही मालिका अधिकच खुलून आली आहे. शीतल क्षीरसागर, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी या जाणत्या कलाकारांची साथ या मालिकेला मिळाली आहे. या मालिकेत परी हे पात्रदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परीची (Pari) भूमिका बालकलाकार मायरा वायकुळ (Myra vaikul) हिने साकारली असून आणखी एक बालकलाकार या मालिकेतून पाहायला मिळत आहे. या बालकलाकाराच्या अभिनयाचंदेखील कौतुक होत आहे. हा बालकलाकार म्हणजे पिचकू (Pichku). वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत ‘पिचकू’ नावाचे हे पात्र थोडेसे अल्लड दाखवण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे म्हणजे मालिकेतील यशचा चुलत भाऊ म्हणजे त्याच्या काकांचा मुलगा पिचकूची भूमिका वेद आंब्रे (ved ambre biography) साकारताना दिसत आहे. वेदने यापूर्वी देखील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे काहींनी त्याला यामुळे ओळखलं देखील असेल. वेद लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये ज्युनिअर यशच्या भूमिकेत दिसला होता. वाचा : 'Rasika sunil'ने समुद्रकिनारी गुपचूप उरकलं लग्न, वेडिंग फोटो व्हायरल या मालिके खेरीज गाथा नवनाथांची, स्वराज्यजननी जिजामाता, सिंधू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, विठू माऊली, तू माझा सांगाती, लक्ष्मी सदैव मंगलम, ग्रहण, खुलता कळी खुलेना, लक्ष्य, सावधान इंडिया, अस्मिता, स्पेशल 5, आपला माणूस अशा अनेक गाजलेल्या मालिकेतून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. एवढ्या कमी वयात त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमठवला आहे. इतक्या कमी वयात एवढ्या मालिकेंध्ये काम करणारा वेद हा बहुतेक एकमेव बालकलाकार असावा. या सगळ्यामध्ये त्याचे कष्ट आणि त्याची अभिनयची आवड दिसून येते. वाचा : RIP Puneeth Rajkumar: अभिनेत्याचे Unseen फोटो VIRAL; असा दिसायचा 'बेबी पुनीत' वेद सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत पिचकूच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या मालिकेत त्याच्या भूमिकेस इतकंसं महत्त्व नाही मात्र तरी पुढे जाऊन हे पात्र काय धमाल उडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण यशच्या काकू आपल्याच मुलाला प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी सर्व खेळी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे पिचकू हे पात्र देखील त्याच धाटणीचे असेल किंवा तो यशची बाजू घेण्याचा प्रयत्न करणार का हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: