नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत काही रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहेत. येत्या काही भागांमध्ये यश आणि नेहामध्ये प्रेम आणखी बहरत गेलेलं दिसून येणार आहे. नेहाने यशवर आपलं प्रेम असल्याचं कबुल केल्यांनतर यश फारच आनंदी आहे. त्याने अनेक दिवस या क्षणाची प्रतीक्षा केली होती. यश लवकरच नेहाला डिनर डेटवर . इतकंच नव्हे तर यश नेहाला अगदी रोमँटिक अंदाजात प्रपोजसुद्धा करणार आहे. याआधीही यशने नेहावर आपलं प्रेम असल्याचं कबुल केलं होतं परंतु त्यावेळी नेहा करून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. एका मुलीची आई असल्याची कुणीच असणारी नेहा सतत यशला टाळत होती. परंतु अखेर तिने यशवर आपलं प्रेम असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे मालिकेत सध्या रोमँटिक वातावरण पाहायला मिळत आहे.View this post on Instagram
नेहा आणि यशला एकत्र आणण्यासाठी मालिकेत समीर आणि जेसिकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यशाची मैत्रीण जेसिकाच्या येण्याने नेहा यशला गमावण्याची भीती वाटू लागली होती. ती सतत त्यांना अस्वस्थ होत होती. आणि अखेर यश, जेसिका आणि समीरचा हा प्लॅन यशस्वी ठरला. नेहाने सरत्या शेवटी आपलं प्रेम मान्य केलं. खरं तर नेहाला यशवर असलेल्या आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी जेसिकाला यश आणि समीरने बोलावलेलं. जेसिकाची भूमिका एका रशियन अभिनेत्रीने साकारली होती. नुकतंच तिचा मालिकेतील ट्रॅक संपला आहे. (हे वाचा:तुम्ही एक मोठे philosopher आहात',श्रेयाने भाऊ कदम यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट) नेहा आणि यशची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की अलीकडे प्रेक्षकांना मॅच्युअर लव्हस्टोरीज जास्त पसंत पडत आहेत. दरम्यान मालिकेत नेहाचा लुक बदलणार अशीसुद्धा चर्चा सुरु आहे. साध्या सरळ नेहाच्या लुकमध्ये मात्र मालिकेत मोठा बदल होणार आहे. आता नेहाचा ग्लॅम अवतार पाहायला मिळणार आहे. नेहाला नव्या लुकमध्ये पाहायला प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.